• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पोकोचा नवीन स्मार्टफोन 8000mAh बॅटरीच्या क्षमतेसह कमी किमतीत झाला भारतात लाँच

August 4, 2026 by admin Leave a Comment


पोको कंपनीने भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन पोको एम8 पॉवर, लाँच केला आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 4 जनरेशन 4 प्रोसेसर, मोठी 8000mAh बॅटरी आणि 120Hz AMOLED डिस्प्ले आहे. कंपनीने हा फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर केला असून लाँच ऑफरचा भाग म्हणून ग्राहकांना खरेदीवर विशेष सवलतही मिळणार आहे. हा स्मार्टफोन 7 ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. चला तर मग या फोनची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

पोको एम8 पॉवर: किंमत, ऑफर्स आणि उपलब्धता

पोको एम8 पॉवरच्या 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज व्हेरिएंटची भारतातील किंमत 24 हजार 999 रूपये आहे. पण लाँच ऑफर अंतर्गत हा व्हेरिएंट तुम्ही 21 हजार 999 रूपयांच्या किमतीत खरेदी करू शकता. तर यातील 8जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 27 हजार 999 रूपये आहे. लाँच ऑफर अंतर्गत हा व्हेरिएंट 24 हजार 999 रूपये या प्रभावी किमतीत खरेदी करता येतील. या ऑफरमध्ये पहिल्या 12 तासांसाठी 1 हजार कूपन डिस्काउंट आणि 2 हजार बँक डिस्काउंट किंवा एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. हा स्मार्टफोन 7 ऑगस्टपासून फ्लिपकार्ट आणि इतर रिटेल चॅनेलवर ब्लॅक, ब्लेझ ऑरेंज आणि ग्रीन रंगांमध्ये उपलब्ध होईल.

पोको एम8 पॉवर: डिस्प्ले, प्रोसेसर

  • पोको एम8 पॉवर हा अँड्रॉइड 16 वर आधारित असलेल्या शाओमी हायपरओएस 3 वर चालतो आणि यात ड्युअल-सिम सपोर्ट आहे. कंपनी या फोनसाठी चार वर्षांचे अँड्रॉइड अपडेट्स आणि सहा वर्षांचे सुरक्षा अपडेट्स देण्याचे आश्वासन देते.
  • यात 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 1800 निट्स पर्यंतच्या पीक ब्राइटनेससह 6.83-इंचाचा फुल एचडी+ अमोलेड डिस्प्ले आहे.
  • तर हा डिस्प्ले डीसीआय पी3 कलर गॅमट, टीयूव्ही आय प्रोटेक्शन सर्टिफिकेशन, कॉर्निंग गोरिला ग्लास 7आय आणि वेट टच 2.0 ला सपोर्ट करतो.
  • या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे. यात स्नॅपड्रॅगन 4 प्रोसेसर, 8जीबी पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 128जीबी यूएफएस 2.2 स्टोरेज आहे.

पोको एम८ पॉवर: कॅमेरा आणि बॅटरी

फोटोग्राफीसाठी, यात 50-मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा, एक एआय कॅमेरा आणि सेल्फीसाठी 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पोको एम8 पॉवरमध्ये 8000mAh क्षमतेची सिलिकॉन कार्बन बॅटरी आहे, जी 45W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 22.5W वायर्ड रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी यात 5जी, 4जी एलटीई, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.1 आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. तसेच या फोनचे वजन 225 ग्रॅम आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात
  • मनोज जरांगेंचा मोठा विजय? सरकारने थेट दिला शब्द, येत्या दोन-तीन दिवसांत… विखे पाटलांनी सांगून टाकलं!
  • Brahmastra 2 Update : रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये ‘सैयारा’ स्टारची एंट्री ! कधी सुरू होणार शूटिंग ?
  • महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिलासा: शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in