• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पुन्हा एकदा ..! केएल राहुलने हातातला सोपा झेल सोडला, गॉलमधील चुकीचा फटका बसणार!

August 17, 2026 by admin Leave a Comment

KL Rahul Catch Drop: गेल्या काही मालिकांमध्ये खेळाडूंच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटका टीम इंडियाला बसत आहे. त्यामुळे ही चूक सुधारण्यासाठी श्रीलंकेत पाय ठेवताच काम सुरू झालं. श्रीलंकेत भारतीय संघाने झेल पकडण्याचा सराव सर्वप्रथम केला. पण इतकं करूनही केएल राहुलने सामन्याच्या दिवशी सर्वकाही व्यर्थ घालवलं. फलंदाजीत योगदान दिल्यानंतर क्षेत्ररक्षणात त्याच्याकडून अशा कामगिरीची अपेक्षा नव्हती. त्याने निरशन डिकवेलाचा सोपा झेल सोडला. केएल राहुलची ही चूक टीम इंडियावर भारी पडू शकते. कारण श्रीलंकेने 128 धावांवर 5 गडी गमावले होते आणि दबाव वाढवण्याची संधी हातातून गेली. कारण डिकवेलाची विकेट मिळाली असती तर शेपटच्या फलंदाजांना झटपट बाद करण्याची संधी होती. निरोशन डिकवेलाचा झेल सोडला तेव्हा तो 20 धावांवर होता. या संधीचा फायदा त्याने घेतला आणि सोनल दिनुषासोबत भागीदारी केली. तसेच वैयक्तिक अर्धशतकही ठोकलं.

केएल राहुलने 36व्या षटकात केली चूक

टीम इंडियाकडून 36वं षटक टाकण्यासाठी मानव सुथार आला होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर केएल राहुलने झेल सोडला. डिकवेलाने चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला. पण बॅटची किनार घासून फर्स्ट स्लिपला उभ्या असलेल्या केएल राहुलच्या हातात गेला. पण त्याने झेल सोडला आणि इतर खेळाडूंना डोक्यावर हात मारण्याशिवाय पर्याय उरला नाही. गोलंदाज मानव सुथारही या प्रकारामुळे नाराज दिला. कारण डिकवेला आणि सोनलने खेळपट्टीवर जम बसवला होता. त्यांची जोडी फोडण्याची एक संधी केएल राहुलमुळे सुटली.

🚨 KL Classic fielding

-KL Rahul dropped Dickwella on 20 runs …
and now he’s gone on to score a fifty. 🫡

Always playing for the opposition , whether it’s batting or fielding. 😵‍💫
pic.twitter.com/iZ7OoRVuoz

— ONE7 (@17pixles) August 17, 2026

केएल राहुलने झेल सोडल्यानंतर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. कारण या सामन्याच्या तीन दिवस आधी स्लिपला उभं राहून झेल पकडण्याचा सराव केला होता. इतकं करूनही सामन्यात चूक करायची ती केलीच. त्यामुळे क्रीडाप्रेमी नाराज झाले आहेत. झेल सोडण्यात टीम इंडियाने मागच्या काही मालिकांमध्ये कहर केला आहे. श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारताने 3 महिन्यात 28 झेल सोडले होते.

  • अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीत भारताने 4 झेल सोडले होते.
  • अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत एक झेल सोडला होता.
  • आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी20 मालिकेत 6 झेल सोडले होते.
  • इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत 5 झेल सोडले होते.
  • इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालेकत 2 झेल सोडले होते.
  • झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 मालिकेत 10 झेल सोडले होते.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in