• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पुण्यातून धक्कादायक बातमी! MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; राज्यभरात संताप!

September 9, 2026 by admin Leave a Comment


पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आलेल्या 28 वर्षीय तरुणाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रथमेश दिलीप देशमुख असे मृत तरुणाचे नाव असून तो मूळचा धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील खासापुरी येथील रहिवासी होता. आर्थिक अडचणी, कर्जबाजारीपणा तसेच मराठवाड्यातील नापिकीमुळे तो तणावात असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

प्रथमेश करत होता स्पर्धा परीक्षेची तयारी

प्रथमेश देशमुख मागील सुमारे आठ महिन्यांपासून पुण्यातील शनिवार पेठ परिसरातील पेपर गल्ली येथे राहत होता. त्याने यूपीएससी आणि एमपीएससी या दोन्ही स्पर्धा परीक्षा दिल्या होत्या. मात्र, एकाही परीक्षेची पूर्व परीक्षा उत्तीर्ण न झाल्याने तो काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याचे समोर आले आहे. पुढील काळात पुन्हा प्रयत्न करण्याऐवजी तो गावी परतण्याच्या विचारात होता.

प्रथमेशवर अडीच लाखांचे कर्ज

प्रथमेशवर अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच मूळ गावी सोयाबीनचे पीक नापिकीमुळे जळून गेल्याने कुटुंबासमोरील आर्थिक संकट वाढले होते. या सर्व परिस्थितीमुळे तो तणावात असल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. घटनेच्या आदल्या दिवशी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास प्रथमेश आपल्या रुमवर आला होता. त्यानंतर त्याने टोकाचे पाऊल उचलले. घटनास्थळी पोलिसांना चिट्ठी आढळून आली असून त्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडून तपासाला सुरुवात

प्रथमेशच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले असून त्याच्या पश्चात आई आणि चार विवाहित बहिणी आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याची माहिती समोर आली आहे. मुलाने स्पर्धा परीक्षेत यश मिळवून कुटुंबाला आर्थिक आधार मिळवून द्यावा, अशी कुटुंबीयांची अपेक्षा होती. मात्र त्याला अपयश आल्याने त्यांने टोकाचे पाऊल उचलले आहे. या घटनेची नोंद पुण्यातील नारायण पेठ पोलीस चौकीत करण्यात आली असून पोलिसांकडून चिट्ठीसह अन्य बाबींच्या आधारे तपास सुरू आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 80s Photo Trend : 80s फोटो ट्रेंड सुपरहिट; पण फोटो बनवताना सावधान! ‘या’ चुका टाळा, नाही तर…
  • मोठी बातमी! ज्याची भीती होती तेच घडलं, इराणचा अमेरिकेला सर्वात मोठा झटका, आता ट्रम्प काय करणार? जगाचं लक्ष
  • नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज मनोज जरांगे यांच्या भेटीला, मोठ्या घडामोडी….
  • व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता…
  • Amruta Fadanvis : ते माझे भाऊ; अमृता फडणवीसांचं जरांगें पाटलांना जेवणाचं निमंत्रण

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in