• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण,आरोपी बंडू फाटक यांची निर्दोष सुटका

August 21, 2026 by admin Leave a Comment


पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील एक आरोपी बंडू फाटक यांना हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई हायकोर्टाने आरोपी बंडू फाटक यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार राजेंद्र हगवणे यांना पवना डॅमच्या फार्महाऊसवर आसरा दिल्याचा आरोप बंडू फाटक यांच्यावर होता. पुणे सत्र न्यायालयाने त्यांचा या खटल्यातून डिस्चार्ज करण्याचा अर्ज फेटाळल्यानंतर बंडू फाटक यांनी हायकोर्टात धाव घेतली होती.

आरोपीला केवळ जेवण किंवा राहण्याची जागा देणे म्हणजे ‘Harbouring’ चा गुन्हा ठरत नाही असा युक्तीवाद बचाव पक्षाच्या वकीलाने केला होता. गुन्ह्याची माहिती असणे आणि आरोपीला लपवण्याचा हेतू याची माहिती आवश्यक असल्याची हायकोर्टात सुनावणी दरम्यान मागणी करण्यात आली होती. न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.  वकील प्रशांत पाटील यांनी बंडू फाटक यांची बाजू मांडली. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने 22 मे 2025 रोजी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. वैष्णवी हगवणे हीने सासरच्या हुंड्याच्या मागणीमुळे सासरच्या जाचाला कंठाळुन जीवन संपवल्याने हे प्रकरण प्रचंड गाजले होते.

या प्रकरणात राजेंद्र हगवणे, त्यांची पत्नी, दोन मुले, मुलगी आणि कौटुंबिक मित्र यांच्यावर हुंडाबळीचा आणि आत्म हत्येस प्रवृत्त केल्याचा गु्न्हा दाखल झाला होता. वैष्णवी हगवणे ( २४ ) ही गळफास घेऊन आपले जीवन संपवले होते. या प्रकरणात तिचे सासरे राजेंद्र हगवणे यांच्या सह ११ जणांवर पुणे कोर्टाने आरोप पत्र दाखल केले होते.

वैष्णवी हीच्या लग्नात तिच्या घरच्यांनी सासरच्या मंडळींना ५१ तोळे सोनं, फॉर्च्यूनर कार, चांदीची भांडी दिली होती. तरी देखील लग्नानंतर सासरच्या मंडळींनी पैशांसाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याने तिने टोकाचं पाऊल उचललं. आपल्या मुलीचा खून करण्यात आल्याचा आरोप वैष्णवीच्या घरच्यांनी केला आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर, वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातून बडतर्फ केले होते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in