• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पुणे हादरलं! 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार, पांढरी पावडर देऊन…हॉटेलमध्ये डांबून अत्याचार केल्याने खळबळ!

August 22, 2026 by admin Leave a Comment


आपलं करिअर घडवण्यासाठी आज मुली घराबाहेर पडत आहेत. अशीच एक 22 वर्षीय तरुणी चांगल्या पगाराच्या शोधात असताना वचित्र अशा जाळ्यात फसली. त्यानंतर तिच्यावर एका लॉजमध्ये सामूहिक अत्याचार करण्यात आलाय. पांढऱ्या रंगाचे पाडवर देऊन तिच्यावर हे क्रूर कृत्य करण्यात आले. ही घटना समोर येताच महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार एका  २२ वर्षीय तरुणीला चांगल्या पगाराचे काम मिळवून देतो, असे सांगून आरोपींनी तिला कारमधून शिरूर येथे आणले. १९ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट या दोन दिवसांच्या कालावधीत शिरूर गावच्या हद्दीतील ‘हॉटेल मार्वल इन लॉजिंग’ येथील खोलीमध्ये  तरुणीला डांबून ठेवण्यात आले. तिथे तिला बळजबरीने नशा येणारी पांढरी पावडर खायला देऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

घटना नेमकी कुठली आहे?

पुण्यातील शिरूर शहरात माणुसकीला काळीमा फासणारी  संतापजनक घटना घडली आली आहे. चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून या २२ वर्षीय तरुणीला लॉजमध्ये डांबून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा. ती परप्रांतीय असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पीडीत तरुणी पुणे जिल्ह्यात कामानिमित्त आली होती. ती मूळची छत्तीसगड येथील आहे. या नरक यातनेतून सुटका झाल्यानंतर पीडित तरुणीने शिरूर पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला सर्व प्रकार पोलिसांसमोर मांडला. आता पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in