• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पावसाळ्यात घराच्या आजुबाजूलाच फिरतो हा साप, शांतपणे करतो थेट हल्ला, घराजवळ दिसताच सर्वात अगोदर..

July 6, 2026 by admin Leave a Comment


राज्यात धो धो पाऊस सुरू आहे. मोठा अलर्ट देण्यात आला. काही ठिकाणी दरड कोसळत आहेत. यादरम्यानच सापांच्या बिळात पाणी गेल्याने सापही पाण्यात दिसत आहेत. यावेळीच सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ सापाचा व्हायरल झाला. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओने मोठी खळबळ उडाली. सापाचा हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतोय. व्हिडीओमध्ये काळसर रंगाचा आणि अंगावर फिकट पट्टे असलेला साप दिसत आहे. हा व्हिडीओमध्ये दिसणारा साप दुसरा तिसरा कोणीही नसून मण्यार साप आहे. या सापाचे सर्वात मोठे वैशिष्ट म्हणजे हा साप फक्त रात्रीच्या वेळीच बाहेर पडतो. हा साप इतर सापांप्रमाणे लगेचच हल्ला करत नाही तर अत्यंत सावधानतेने हल्ला करतो. त्याला सायलेंट किलर म्हटले जाते. सर्वात हैराण करणारे म्हणजे हा साप चावला हे देखील लोकांना लवकर कळत नाही. रात्रीच्या अंधारात हा साप हल्ला करून लगेचच निघून जातो.

या सापाचे दात खूप जास्त लहान असतात. त्यामुळे हा साप ज्यावेळी चावतो, त्यावेळी कोणाला अंदाजाही होत नाही की, आपल्याला साप चावला.बहुदा हा साप चावल्याचे कळण्यास उशीर होतो. खूप जास्त उशीरा हा साप चावल्याचे कळते. ज्यामुळे व्यक्तीचा जीव जाण्याची अधिक शक्यता असते. मण्यारमध्ये असलेल्या विषामध्ये न्यूरोटॉक्सन प्रकारचे असतात.

ज्यामध्ये हे विष थेट मज्जासंस्था आणि स्नायूंना थेट परिणाम करतो. या सापाचे दात इतके छोटे असतात की, लवकर कळतही नाही की साप चावला आहे. ज्यामुळे हा साप चावल्यानंतर मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. हा साप चावल्यानंतर अजिबातच तीव्र वेदना होत नाही. सापाचा रंग काळसर असल्याने रात्रीच्या अंधारात तो जवळ आल्याचेही कळत नाही. त्यामध्येच हा व्हिडीओ व्हायरल होतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by akhil bhandari (@akhil_bhandari_photography)

व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, साप रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन जात आहे. त्याला कुठे काही आवाज आला की, तो थांबत आहे. त्यानंतर पुन्हा पुढे जात आहे. हा साप इतक्या सावधपणे चालत आहे की, कोणीही म्हणण्यार नाही की, इतका खतरनाक साप हा जातोय. हा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसताना दिसत आहे. लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दीड हजार परत घ्या, मी 3 हजार देते, लाडक्या बहिणीचा संताप; दुष्काळ झळांमुळे अश्रूही अनावर!
  • Monsoon: मान्सूनचे लवकरच टाटा-बाय बाय? यंदा लवकरच निरोप घेणार? सप्टेंबरमध्ये पावसामुळे नवीन टेन्शन
  • Friday Remedies: शुक्रवारी करा ‘हे’ 5 सोपे उपाय; माता लक्ष्मीच्या कृपेने दूर होईल पैशांची चणचण!
  • मोठी बातमी ! आता रूपाली चाकणकरांचं पुण्यात बार-रेस्टॉरंट, उद्घाटनाला बडे नेते, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in