• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पावसातील अक्षय-प्रियंकाचं प्रचंड रोमँटिक गाणं, जे अनेक वर्षे प्रदर्शित झालच नाही

August 7, 2026 by admin Leave a Comment


2005 मध्ये प्रदर्शित झालेला ‘बरसात’ हा बॉबी देओल, प्रियंका चोप्रा आणि बिपाशा बसू यांच्या प्रमुख भूमिका असलेला रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. विशेषतः ‘बरसात के दिन आए’ हे गाणं आजही लोकप्रिय असून पावसाळ्याची आठवण करून देते. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती ज्येष्ठ दिग्दर्शक-निर्माते सुनील दर्शन यांनी केली होती.

सुनील दर्शन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, सुरुवातीला ‘बरसात’ या चित्रपटासाठी अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्रा यांची जोडी निश्चित करण्यात आली होती. इतकेच नाही तर ‘बरसात के दिन आए’ हे गाणं देखील अक्षय आणि प्रियंकावर चित्रित करण्यात आले होते. मात्र, काही कारणांमुळे अक्षय कुमारने अचानक चित्रपटातून माघार घेतली. त्यानंतर त्याच्या जागी बॉबी देओलची निवड करण्यात आली.

हरवलेलं गाणं प्रदर्शित होताच सुपरहिट

दर्शन यांच्या मते, त्या काळात अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्रा याच्या नात्याबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या. चित्रपट सोडण्यामागे हेही एक संभाव्य कारण असू शकते असे त्यांनी सूचित केले. अनेक वर्षांनंतर स्टोअररूममध्ये साफसफाई करताना त्यांना या चित्रपटाचे जुने फुटेज सापडले. त्यामध्ये अक्षय आणि प्रियंकावर चित्रित केलेले ‘बरसात के दिन आए’ हे गाणं होते. हे फुटेज नव्या पद्धतीने संपादित करून त्यांनी पुन्हा प्रदर्शित केले. गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. सुरुवातीला अनेकांना वाटले की अक्षय आणि प्रियंका पुन्हा एका नव्या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत, मात्र नंतर हे जुन्या चित्रपटातील अप्रकाशित गाणं असल्याचे स्पष्ट झाले.

शेवटी बिपाशाने साकारली भूमिका

दरम्यान, काही वृत्तांनुसार चित्रपटातील बिपाशा बसू यांच्या भूमिकेसाठी सुरुवातीला कॅटरिना कैफचा विचार करण्यात आला होता. मात्र, अखेरीस ही भूमिका बिपाशा बसूने साकारली.

अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्रा यांनी यापूर्वी ‘अंदाज’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘एतराज’ आणि ‘वक्त’ यांसारख्या यशस्वी चित्रपटांत एकत्र काम केले होते. त्यांची जोडी प्रेक्षकांना विशेष आवडली होती. मात्र, त्यानंतर दोघांनी पुन्हा एकत्र काम केले नाही. यामागे विविध अफवा चर्चेत राहिल्या, पण कोणतेही अधिकृत कारण समोर आले नाही. आज प्रियंका चोप्रा हॉलिवूड आणि बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे तर अक्षय कुमारही हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मी शाहरुखपेक्षा चांगलं काम करत होतो म्हणून सीन्सच कापले; ‘जोश’च्या अभिनेत्याचा धक्कादायक दावा
  • साखरेचे भाव वाढत असताना रेशन दुकानात सुरु तरी काय? सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ
  • सर्वात मोठी बातमी ! ओबीसी नेत्यांमध्ये फूट? 1 सप्टेंबरच्या मोर्चाआधीच… तायवाडे आणि हाकेंमध्ये जुंपली
  • दोघी भाजपच्या नगरसेविका, महापौर तावडे आणि शिरवडकरांमध्ये वाजलं का? अमित साटम यांनी सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
  • ऑस्ट्रेलियाने भारताला दिला धक्का, शेतकऱ्यांची वाढली चिंता; पाकिस्तानला झाला आनंद

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in