
मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टाने पोलिसांना महत्त्वपूर्ण सवाल केला आहे. या प्रकरणी पार्थ पवारांना आरोपी का करण्यात आले नाही, अशी विचारणा कोर्टाने पोलिसांकडे केली आहे. हायकोर्टाने पार्थ पवारांच्या भूमिकेबाबत पोलिसांकडून सविस्तर स्पष्टीकरण मागितले आहे. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीदरम्यान पोलिसांची भूमिका आणि त्यांनी दिलेले स्पष्टीकरण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकलपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. मुंडवा येथील 40 एकर सरकारी जमीन अमेडिया कंपनीने बेकायदेशीरपणे खरेदी केल्याचा आरोप आहे.
या मोठ्या गैरव्यवहारामध्ये पार्थ पवार यांचा सहभाग असल्याचा दावा करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर, त्यांच्या भूमिकेबद्दल पोलिसांनी नेमकी काय तपासणी केली आणि त्यांना आरोपी का केले नाही, याबाबत कोर्टाने पोलिसांकडून त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. कोर्टाने आज पुन्हा पोलिसांकडे विचारणा केली की, पार्थ पवारांना आरोपी का केले नाही आणि या संदर्भातली पोलिसांची भूमिका स्पष्ट करा. मुंबई हायकोर्टाच्या या प्रश्नामुळे मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पोलिसांकडून मिळणाऱ्या उत्तरावर या प्रकरणाचे भवितव्य अवलंबून असेल, असे न्यायालयीन सूत्रांचे म्हणणे आहे.
Leave a Reply