
Kanpur Crime News : कोट्यवधींची संपत्ती असलेले कानपूरचे व्यावसायिक विनीत मिनोचा यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या सांगण्यानुसार, , या हत्येचा संपूर्ण कट विनीत यांची सून शालू हिने रचला होता. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, ज्या वेळी तिच्या सासऱ्यांची हत्या होत होती, त्याच वेळी शालू तिचा पती सुब्रतसोबत पार्टीमध्ये डान्स करत होती. शालूने हत्येचं संपूर्ण प्लानिंग केलं होतं आणि पार्टीत असतानाही फोनवरून ती मारेकऱ्यांना सतत सूचना देत होती, असा दावा पोलिसांनी केला. दरम्यान, पार्टीमधील शालूचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती पती सुब्रतसोबत डान्स करताना दिसली. तुम तो धोखेबाज हो, वादा करके भूल जाते हो’ या गाण्यावर ती डान्स करत होती, असं दिसतंय. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हत्येचा कट रचूनच शालू पार्टीला गेली होती. मात्र तिच्या वागण्यातून ती एवढ्या गंभीर कटात सहभागी असेल याचा पार्टीत उपस्थित असलेल्या कोणालाही संशय आला नाही.
हत्येपूर्वी मारेकऱ्यांना घरात लपवलं
पोलिसांच्या तपासानुसार, 5 सप्टेंबरच्या रात्री शालूने त्यांच्या घरातला जुन्या नोकर विशालला फोन करून अपार्टमेंटमध्ये बोलावलं. विशाल त्याचा साथीदार राजकिशोर याच्यासोबत तिथे पोहोचला. दोघांच्या हातात गजरा होता. अपार्टमेंटच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकाने विचारल्यार, विशालने त्याचं नाव ‘शिवम’ असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने शालूला गजरा दिला आणि तिच्याशी काही वेळ तो बोलला देखील. यानंतर शालूने दोन्ही आरोपींना विनीत यांच्या खोलीत लपवले. पोलिसांच्या मते, त्यानंतर शालू पती सुब्रत व मुलासोबत पार्टीसाठी रवाना झाली.
हत्या होत असताना डान्स करत होती शालू
मिळालेल्या माहितीनुसार, ही पार्टी सुब्रतने शहरातील कॉस्मोजिन लाउंजमध्ये आयोजित केली होती. पार्टी रात्री साडेअकराच्या सुमारास सुरू होणार होती. मात्र, शालू आणि सुब्रत रात्री साडेदहाच वाजता, म्हणजे जवळपास एक तास आधीच पार्टीच्या ठिकाणी पोहोचले होते. त्या पार्टीत 20-25 माणसं होती, बहुतांश कपल्स तिथे होती. रात्री 2 पर्यंत लोकं त्या पार्टीत डान्स करत होते. याचदरम्यान तिकडे घरात लपलेले विनीत मिनोचा यांच्या झोपण्याची वाट बघत होते. प्लाननुसार, ते झोपल्यावर उशीने तोंड दाबून त्यांना मारायचं होतं, जेणेकरून नंतर हार्टअटॅकने मृत्यू झाल्याचं दाखवता येईल.
मात्र घरी पोहोचल्यावर आरोपी जिथे लपले होते, विनीत यानी त्या खलीचा दिवा लावला. त्याना दोन्ही आरोपी दिसल्याने विचारणा केली. अखेर आरोपींनी त्यांच्यावर चाकून वार करत त्यांना मारलं. विनीत यांचा मृत्यू झाला. हत्येनंतर आरोींनी हात-पाय धुतले आणि ते फरार झाले. शालूला त्यांनीहत्येबद्दल कळवलं. ती पहाटे 3 च्या सुमारा मुलगा-पतीसोबत घरी पोहोचली.
घरी पोहोचताच शालून रडत फोडला हंबरडा
पोलिसांच्या सांगण्यानुसार, घरी पोहोचल्यानंतर शालूने आजूबाजूच्या लोकांना बोलावण्यासाठी आरडाओरड सुरू केली आणि ती रडू लागली. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा विनीत यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. जमिनीवर सर्वत्र रक्त सांडले होते, तर त्यांच्या शरीरावर चाकूने वार केल्याच्या अनेक खुणा आढळून आल्या. पोलिसांनी CCTV तपासलं असता दोन्ही आरोपी घरात आता जाताना आणि नंतर बाहेर पडताना त्यात दिसले. त्या आधारे पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपी विशाल आणि राजकिशोरला शोधत बेड्या ठोकल्या.
सासरे सतत टोचून बोलायचे, शालूने सांगितली नाराजीची कारणं
आरोपींच्या कबुलीत शालूचं नाव आलं. चौकशीदरम्यान विशालने पोलिसांना सांगितलं की, सुमारे 20 दिवसांपूर्वी तो कामानिमित्त सुब्रतच्या घरी गेला होता. त्यावेळी शालूने आपल्या सासऱ्यांच्या सततच्या हस्तक्षेपामुळे आपण वैतागल्याच त्याला सांगितलं. घरात CCTV कॅमेरे बसवून आपल्यावर नजर ठेवली जात असल्याचाही दावा तिने केला. गरजेनुसारच पैसे मिळतात अशीही तिची तक्रार होती.
शालूने सुरुवातीला विनीत यांचा अपघात घडवून आणण्याची कल्पना विशालसमोर मांडली होती. मात्र, विशाल त्यासाठी तयार झाला नाही. त्यानंतर झोपेत असताना उशीने तोंड दाबून विनीत यांची हत्या करण्याचा पर्याय सुचवण्यात आला. तोही फेल ठरल्यावर अखेर चाकून मारून त्यांची हत्या करण्यात आली , असा दावा पोलिसांनी केला. या कामाच्या बदल्यात विशालला 6 लाख रुपये देण्याचे तसेच त्याला पुन्हा नोकरीवर ठेवण्याचे आमिष दाखवण्यात आले होते, अशी माहिती देखील समोर आली. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
Leave a Reply