• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पहिले 3 दिवस रिकाम्या खुर्च्या, नंतर तिकीटांसाठी उडाली झुंबड; ब्लॅकमध्ये विकली तिकीटं, 6 वर्षे थिएटरमध्ये चालला हा चित्रपट

August 18, 2026 by admin Leave a Comment

हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही चित्रपट असे आहेत, ज्यांना प्रदर्शित होताना प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही; मात्र पुढे याच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर असा धुमाकूळ घातला की ते कल्ट क्लासिक म्हणून ओळखले जाऊ लागले. याच यादीतील सर्वात मोठे नाव म्हणजे रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’.

15 ऑगस्ट 1975 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘शोले’ला सुरुवातीचे काही दिवस अत्यंत थंड प्रतिसाद मिळाला होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास तीन दिवस अनेक थिएटरमध्ये प्रेक्षकांची गर्दी दिसत नव्हती. त्यामुळे चित्रपटाचे कलाकार आणि निर्माते काहीसे चिंतेत पडले होते.

मात्र काही दिवसांतच चित्रपटाची परिस्थिती पूर्णपणे बदलली आणि ‘शोले’ने हिंदी सिनेमाच्या इतिहासात आपले नाव कायमचे कोरले. या चित्रपटात धर्मेंद्र अमिताभ बच्चन हेमा मालिनी जया बच्चन अमजद खान आणि संजीव कुमार यांसारख्या दिग्गज कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

मात्र काही दिवसांतच चित्रपटाची परिस्थिती पूर्णपणे बदलली आणि ‘शोले’ने हिंदी सिनेमाच्या इतिहासात आपले नाव कायमचे कोरले. या चित्रपटात धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, जया बच्चन, अमजद खान आणि संजीव कुमार यांसारख्या दिग्गज कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

चित्रपटात जेलरची भूमिका साकारणारे असरानी यांनी एका मुलाखतीत ‘शोले’च्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण सांगितली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार ते जुहू येथील एका थिएटरमध्ये दुपारी तीन वाजताचा शो पाहण्यासाठी गेले असता थिएटर जवळपास रिकामे होते. दुसऱ्या दिवशी देखील तीच परिस्थिती होती. त्यामुळे कलाकारांमध्येही चित्रपट का चालत नाही याबाबत चर्चा सुरू झाली होती.

चित्रपटात जेलरची भूमिका साकारणारे असरानी यांनी एका मुलाखतीत ‘शोले’च्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण सांगितली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते जुहू येथील एका थिएटरमध्ये दुपारी तीन वाजताचा शो पाहण्यासाठी गेले असता थिएटर जवळपास रिकामे होते. दुसऱ्या दिवशी देखील तीच परिस्थिती होती. त्यामुळे कलाकारांमध्येही चित्रपट का चालत नाही, याबाबत चर्चा सुरू झाली होती.

मात्र तिसऱ्या दिवसानंतर ‘शोले’ची परिस्थिती झपाट्याने बदलली. चित्रपटाची चर्चा वाढू लागली आणि प्रेक्षकांची थिएटरबाहेर गर्दी होऊ लागली. त्यानंतर या चित्रपटाने मागे वळून पाहिले नाही. दीर्घकाळ थिएटरमध्ये सुरू राहिलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम प्रस्थापित केले. नंतर वेळ अशी आली की चित्रपटाचे तिकिट देखील मिळणे कठीण झाले.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in