• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

निस्तेज त्वचेपासून सुटका हवी आहे का? सफरचंद बीट आणि गाजर तुमच्या त्वचेला देतील नैसर्गिक चमक, जाणून घ्या

April 18, 2026 by admin Leave a Comment


उन्हाळ्यात धूळ, ऊन आणि प्रदूषणामुळे चेहऱ्याची चमक हळूहळू कमी होते आणि त्वचा निस्तेज दिसू लागते. तज्ञांच्या मते खरी चमक तेव्हाच येते जेव्हा शरीर आतून निरोगी असते. याकरिता सफरचंद, बीट आणि गाजर एकत्र करून बनवलेला एक विशेष नैसर्गिक पेयं आरोग्य आणि त्वचेसाठी झपाट्याने लोकप्रिय होत आहे .

आरोग्य तज्ज्ञांच्या मते हा पेयं शरीराला आवश्यक पोषक तत्वे तर पुरवतोच, पण त्वचेच्या पेशींना आतून मजबूतही करतो. जेव्हा शरीराला पुरेशी जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात, तेव्हा त्याचे परिणाम चेहऱ्यावर थेट दिसतात. ज्यांची त्वचा निस्तेज आहे किंवा ज्यांच्या चेहऱ्यावर वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागली आहेत, त्यांच्यासाठी हा रस विशेषतः फायदेशीर मानला जातो.

या 3 गोष्टी त्वचेसाठी फायदेशीर आहेत

सफरचंद – सफरचंदामधील व्हिटॅमिन सी शरीरातील कोलेजनच्या निर्मितीस प्रोत्साहन देते. कोलेजन हे एक प्रथिन आहे जे त्वचेला घट्ट ठेवते. जसजसे आपले वय वाढते, तसतसे शरीरातील कोलेजनची पातळी कमी होते, ज्यामुळे सुरकुत्या पडतात आणि त्वचा सैल पडते. सफरचंदामधील अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्स कमी करण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, सफरचंदाचा रस शरीरातील पाण्याचे संतुलन राखतो, ज्यामुळे त्वचा आर्द्र राहते आणि तिला नैसर्गिक चमक येते.

बीट – बीटाला नैसर्गिक रक्त शुद्ध करणारे मानले जाते. त्यातील नायट्रेट्स शरीरात नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित होतात, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेला अधिक ऑक्सिजन व पोषक तत्वे मिळतात. जेव्हा त्वचेला पुरेसे पोषण मिळते, तेव्हा ती अधिक तेजस्वी दिसते. याव्यतिरिक्त बीट यकृताचे कार्य सुधारते, ज्यामुळे शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यास मदत होते. ही प्रक्रिया त्वचा नितळ ठेवण्यास मदत करते.

गाजर – गाजर देखील या पेयांचा एक महत्त्वाचा भाग आहे, कारण त्यात बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते. शरीरात याचे रूपांतर व्हिटॅमिन ए मध्ये होते, जे त्वचेची दुरुस्ती करण्यास आणि नवीन पेशी तयार करण्यास मदत करते. व्हिटॅमिन ए त्वचेला कोरडे होण्यापासून वाचवते आणि त्वचा मऊ ठेवते.

तज्ञांच्या मते जेव्हा सफरचंद, बीट आणि गाजर एकत्र करून रस बनवला जातो, तेव्हा तो शरीरासाठी पोषक तत्वांचा एक उत्तम स्रोत बनतो. हे पेयं त्वचेला आतून पोषण देण्यासोबतच, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास, रक्त शुद्ध करण्यास आणि पेशींचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेने नाकेबंदी उठवली नाही तर… इराणची हादरवणारी धमकी, जगात हाहाकार, थेट..
  • Rahul Gandhi: महिला आरक्षण विधेयक तर लोकसभेत आपटलं, पण हे ’16 नंबर’ चं काय आहे कोडं? राहुल गांधी भाजपची डोकेदुखी वाढवणार?
  • IPL 2026 Mumbai Indians : ‘हार्दिक पंड्या तू कॅप्टनशिप सोड आणि नेतृत्व..’ मुंबई इंडियन्सची स्थिती पाहून कोणी केली कळकळीची विनंती?
  • Gold Price Today : अक्षय्य तृतीयेच्या एक दिवस आधीच गुड न्यूज, सोन्याचे भाव धडाम् ! तुमच्या शहरात किती किंमत ?
  • US-Iran Talk : अमेरिका-इराण संघर्षात एक सकारात्मक बातमी, चर्चेची नवीन तारीख आणि ठिकाण ठरलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in