• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

US-Iran Talk : अमेरिका-इराण संघर्षात एक सकारात्मक बातमी, चर्चेची नवीन तारीख आणि ठिकाण ठरलं

April 18, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका विरुद्ध इराण युद्ध पुन्हा भडकणार तर नाही ना? हीच सगळ्या जगाला चिंता आहे. कारण यामुळे तेल संकट अजून गंभीर होईल. हे युद्ध पुन्हा सुरु होऊ नये. कूटनितीक मार्गाने यावर तोडगा निघाला पाहिजे, यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरु आहेत. या युद्धाचं मूळ कारण आहे ती, इराणची अणवस्त्र संपन्न देश बनण्याची महत्वकांक्षा. ट्रम्प यांनी आधीच म्हटलय की, आम्ही इराणला कधीच अणवस्त्र संपन्न देश बनू देणार नाही. म्हणूनच अमेरिका-इस्रायलने मिळून इराणवर हल्ला केला. कूटनितीक वाटाघाटींमध्ये इराणच्या न्यूक्लियर मुद्यावर चर्चा सुरु होईल. इराणने जितक्या युरेनियमचं संवर्धन केलय ते अमेरिकेला हवं आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये ही चर्चा होईल. रिपोर्ट्स नुसार दोन्ही देशांचे प्रतिनिधी रविवारी पाकिस्तानात पोहोचतील. सोमवारी औपचारिक चर्चा सुरु होईल.

वॉशिंग्टन आणि तेहरान दोघांनी अजून या बैठकीची अधिकृत पुष्टि केलेली नाही. चर्चा लवकरच सुरु होईल याचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच संकेत दिले आहेत. याचा अर्थ पडद्यामागे तयारी पूर्ण झाली आहे. सीएनएनने इराणमधील सूत्रांच्या हवाल्याने म्हटलय की, पुढच्या फेरीची चर्चा इस्लामाबाद येथे सोमवारी होणार आहे. मागच्या आठवड्यात सुद्धा इस्लामाबादमध्ये इराण आणि पाकिस्तानचे प्रतिनिधी भेटले होते, त्यांच्यात अनेक तास चर्चा झाली. पण दोन्ही बाजू कुठल्याही ठोस निष्कर्षाप्रत पोहोचल्या नाहीत. त्यामुळे यावेळची चर्चा जास्त महत्वाची आहे.

..तर परिस्थिती अजून चिघळेल

इराण-अमेरिकेत दोन आठवड्यांसाठी सीजफायर झालं आहे. या सीजफायरचा कालावधी संपत आला आहे. त्यामुळे युद्ध पुन्हा सुरु होऊ शकतं. आता दुसऱ्यांदा होणारी चर्चा सुद्धा फेल गेली, तर परिस्थिती अजून चिघळू शकते. कारण मागच्या आठवड्यात चर्चा फेल झाल्यानंतर अमेरिकेने इराणी बंदरावर जाणाऱ्या आणि तिथून निघणाऱ्या जहाजांसाठी स्ट्रेट ऑफ हॉर्मुज बंद केलं होतं. म्हणून सगळ्या जगाचं लक्ष या बैठकीकडे लागलं आहे.

अनेक मुद्यांवर मतभेद कायम

दोन्ही देशांमध्ये शांतता करार होईल असा विश्वास डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. इराण काही महत्वाच्या मुद्यांवर झुकण्यासाठी तयार आहे असा ट्रम्प यांचा दावा आहे. पण दुसरीकडे इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलय. त्यांचं म्हणणं आहे की, इराणने अजूनपर्यंत कुठलाही करार केलेला नाही. अनेक मुद्यांवर मतभेद कायम आहेत. दोन्ही बाजूला विश्वासाची कमतरता असल्याचं यातून स्पष्ट होतं.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 5 मिनिट 44 सेकंदाचे ते सुपरहिट गाणे, मृत्यूनंतर आणि आत्माच्या मिलनाची कथा, ऐकताच तुमच्या डोळ्यात येईल पाणी
  • Amravati scandal : “द कॅफे रॉयल 10” च्या कंपार्टमेंटमध्ये रंगायचे अश्लील चाळे, प्रत्येकवेळी नवीन मुलगी; फोटो काढून…
  • कारच्या काचेवर काळे डॉट्स का असतात? 99 टक्के लोकांना माहीत नसतं खरं कारण
  • Sanjay Raut : मोदींना अपमानित करण्यासाठीच शाहांनी विधेयक आणलं? संजय राऊत यांचा खळबळजनक सवाल
  • अमेरिकेने नाकेबंदी उठवली नाही तर… इराणची हादरवणारी धमकी, जगात हाहाकार, थेट..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in