• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नितीन गडकरी यांची रात्री 8 वाजता स्वाक्षरी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोलऐवजी इथेनॉल पण..

June 15, 2026 by admin Leave a Comment


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या कार्यक्रमात बोलताना मोठी घोषणा केली. केंद्र सरकारने 100% इथेनॉल इंधनाला हिरवा कंदील दाखवला आहे. इराण आणि अमेरिका युद्धात पेट्रोलचे दर सातत्याने वाढताना दिसले. भारत पेट्रोल-डिझेलकरिता खाडी देशांवर अवलंबून आहे. मात्र, त्याचा पर्याय म्हणून इथेनॉलकडे बघितले जातंय. याबाबत केंद्र सरकार महत्वाची पाऊले उचलली जात आहेत. पेट्रोलवरील पर्याय म्हणून इथनॉलकडे बघितले जातंय. नितिन गडकरी यांनी रात्री 8 वाजता या महत्वाच्या फाईलवर सहीवर केली. पेट्रोल महाग आहे, डिझेलचे भविष्य अनिश्चित आहे.  इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत रेंज अँझायटीचे सावट अजूनही कायम आहे. सरकारने आता एक नवीन पाऊल उचलले आहे. इथेनॉलला मंजुरी दिली. पेट्रोलवरील सर्व गाड्या आता इथेनॉलवर चालवल्या जाऊ शकतात का?. इथेनॉल नक्की काय आहे, याबाबत जाणून घेऊयात.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरातील एका कार्यक्रमात बोलताना आनंदाने सांगितले की, इथेनॉल इंधनासाठीच्या नियमावलीला मंजुरी देण्यात आली आहे. यासंबंधित फाईलवर मी रात्री 8 वाजता स्वाक्षरी केली. आता देशभरात इथेनॉल कायदेशीररित्या वापरले जाऊ शकते. सरकारच्या या घोषणेनंतर इथेनॉल म्हणते नक्की काय आहे, याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

नितीन गडकरी यांनी म्हटले की, दीड ते दोन महिन्यांत ह्युंदाई, टोयोटा आणि एमजी मोटरसारख्या कंपन्याही त्यांच्या फ्लेक्स-फ्यूल कार बाजारात आणतील. इथेनॉल इंधनाकडे पारंपारीक इंधन म्हणून बघितले जाते. इथेनॉल हे मका, ऊस तांदूळ आणि शेतीतील टाकाऊ पदार्थ यांच्या मदतीने तयार केले जाते. इथेनॉलवर गाड्या आरामात चालू शकतात. पेट्रोल ऐवजी बेस्ट पर्याय इथेनॉल आहे.

इथेनॉल भारतातच तयार केले जाते. कोणत्याही देशावर याकरिता अवलंबून राहण्याची अजिबात गरज नाही. शिवाय परकिय चलनावरील दबाव देखील यामुळे कमी होऊ शकतो. त्यामुळेच केंद्र सरकारकडून इथेनॉलला 100 टक्के मंजूरी देण्यात आली. भारतात आधीच E20 पेट्रोलचा वापर केला जात आहे. राज्यात 20 टक्के इथेनॉल तर 80 टक्के पेट्रोल असते. ज्यामुळे मोठ्या पैशांची बचत होत आहे. जर पूर्णपणे इथेनॉलचा पावर शक्य झाला तर हे भारताचे मोठे यश म्हणावे लागेल.

इथेनॉलचा वापर वाढला तर भारतातील पैस बाहेर जाणार नाही. यात शेतकऱ्यांचा फायदा आहे. थेट शेतकऱ्यांना पैसा मिळेल. इथेनॉल पूर्णपणे पेट्रोलची जागा घेईल का? हा लागलीच सांगणे कठीण आहे. इथेनॉल इंधनाचे काही फायदे आहेत पण त्याचे तोटेही आहेत. पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉल इंधनाची ऊर्जा घनता कमी असते. सरकारकडून आता घोषणा करण्यात आली असली तरीही याकरिता थोडा वेळ लागणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कार 8 लाखांची, पण बिल 10 लाखांचे? जाणून घ्या एक्स-शोरूम आणि ऑन-रोड किंमतींमधील खरा फरक
  • BSNLचा ‘हा’ आहे ऑल इन वन प्लॅन, दररोज 3 जीबी हाय स्पीड डेटा आणि अमर्यादित कॉलिंग
  • ENG vs NZ : तिसरा आणि अंतिम कसोटी सामना, कोण जिंकणार मालिका? गुरुवारपासून थरार
  • INDW vs BANW Live Streaming : भारत-बांगलादेशसाठी निर्णायक सामना, किती वाजता सुरुवात होणार?
  • आपण खरंच एकत्र आहोत का? उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडीतील नेत्यांना दोन सवाल, बैठकीत काय काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in