• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ना प्लॅटफॉर्म, ना तिकीट खिडकी, भारतातील अनोख रेल्वे स्टेशन, जिथे ठेकेदार विकायचा तिकीट

May 24, 2026 by admin Leave a Comment


भारतात अशी काही रेल्वे स्टेशन आहेत, जी वेगवेगळ्या कारणांसाठी सोशल मीडियावर चर्चेत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का की, भारतात असं एक रेल्वे स्टेशन आहे जिथे ना प्लॅटफॉर्म, ना तिकीट खडकी, तरीही ट्रेन तिथे थांबते. ठेकेदार विक्री करतो तिकीट.

हे ठिकाण राजस्थानमधील भारत-पाकिस्तान सीमेजवळ असलेल्या लीलमा आणि जैसिंधर येथे आहे. या रेल्वे स्थानकांची अनोखी कहाणी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक वर्षे ही स्थानके विना प्लॅटफॉर्मशिवाय चालत होती, तिथे तिकीट खिडकी देखील नव्हती.

प्रवाशांना तिकीट देण्यासाठी एक ठेकेदार बॅगभर तिकिटे घेऊन ट्रेन येण्याच्या काही मिनिटांपूर्वी स्टेशनवर पोहोचत असे आणि तेथूनच तिकीट विक्री केली जात होती. राजस्थानातील बाडमेर जिल्ह्यात भारत-पाक सीमा भागात ही स्थानके आहेत. सीमावर्ती आणि कमी लोकसंख्या असलेल्या भागामुळे येथे रेल्वे सुविधांचा विकास खूपच मंद गतीने झाला. त्यामुळे अनेक वर्षे प्रवाशांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागले.

या स्थानकांवर प्लॅटफॉर्म नसल्याने ट्रेन थेट रुळांच्या कडेला थांबत असे. प्रवाशांना खाली उभे राहूनच डब्यात चढावे लागत होते. महिलां, वृद्ध आणि मुलांसाठी हा प्रवास विशेषतः धोकादायक आणि त्रासदायक ठरत होता. सामानासह ट्रेनमध्ये चढताना अनेकदा अपघाताची शक्यता निर्माण होत असे.

मात्र आता या स्थानकांचे चित्र बदलू लागले आहे. उत्तर-पश्चिम रेल्वेकडून येथे सुमारे 600 मीटर लांबीचे प्लॅटफॉर्म बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासोबतच वीज आणि इतर आवश्यक सुविधा देखील विकसित केल्या जात आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज… प्रतिक्षा संपली… कर्जमाफीची तिसरी यादी कधी येणार? मोठी अपडेट समोर
  • CM Vijay : LPG सिलेंडरबाबत विजय यांचा सर्वात मोठा निर्णय; जे कुठल्या राज्याला जमलं नाही ते त्यांनी करुन दाखवलं
  • भावासमोर असे कपडे कोण घालतं…, कृती सेनॉनच्या रक्षाबंधच्या जाहिरातीवर गदारोळ, व्हिडीओ व्हायरल
  • Chanakya Niti : पाहुण्यांच्या घरी जात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला
  • Gold Silver Rate: अरेरे सणासुदीला सोने-चांदी पुन्हा आलं रंगात, चार दिवसांत तब्बल 8,000 रुपयांनी भाववाढ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in