• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नातेवाईकांच्या घरी जाण्यापूर्वी या गोष्टींचा कायम विचार करा, चाणक्यांनी दिलेला महत्त्वाचा सल्ला

August 17, 2026 by admin Leave a Comment


आजच्या सोशल मीडियाच्या युगात अनेक जण मोबाईलवरच जवळच्या माणसांची विचारपूस करतात, पण काही जण आजही नातेवाईकांच्या घरी जातात आणि वेळ व्यतीत करतात. पण आपण जेव्हा नातेवाईकांच्या घरी जातो, तेव्हा कधीकधी नकळतपणे आपल्याकडून अशा काही चुका होतात, ज्यामुळे आपली प्रतिमेला ठेच पोहोचते आणि आपल्याबद्दलचा आदर कमी होतो. म्हणूनच, आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, नातेवाईकांच्या घरी जाताना या काही गोष्टी जाणून घेणं खूप महत्त्वाचे आहे. चाणक्य यांनी सांगितल्याप्रमाणे, आदर आणि नातेसंबंध या दोन्हींना धक्का लागू नये यासाठी, नातेवाईकांच्या घरी जाताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला माहित असायला हव्यात, ते पाहूया.

आचार्य चाणक्यांच्या मते, तुम्ही तुमच्या नातेवाईकांच्या घरी त्यांना न कळवता किंवा अचानक जाऊ नये. कारण तो नातेवाईक एखाद्या महत्त्वाच्या कामात व्यस्त असू शकतो किंवा कामासाठी बाहेर जाण्याची तयारी करत असू शकतो. एवढंच नाही तर, त्यांच्या घरात अन्य कोणते प्लान देखील असून शकतात. म्हणून कोणाच्याही घरी जात असाल तरी, त्यांना आधीच कळवा आणि कोणत्याही नातेवाईकाच्या घरी आमंत्रणाशिवाय जाऊ नका.

चाणक्याच्या मते, जेव्हा तुम्ही नातेवाईकांच्या घरी जाता, तेव्हा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही विचारु नका किंवा अनावश्यक सल्ला देण्याची चूक करू नका. ते त्यांचं घर कसं चालवतात, मुलांना कसं शिक्षण देतात किंवा आपला पैसा कुठे खर्च करतात, याबद्दल त्यांना विचारू नका किंवा त्यांनी कोणतासल्ला द्यायला जाऊ नका.

चाणक्य नीतीनुसार, जेव्हा तुम्ही नातेवाईक किंवा मित्राच्या घरी जाता, तेव्हा कधीही रिकाम्या हाताने जाऊ नये. आपल्या क्षमतेनुसार काहीतरी सोबत नेणं नेहमीच चांगलं असतं. फळ किंवा एखादा गोड पदार्थ सोबत न्या, यामुळे त्यांना आनंद होईल.

आचार्य चाणक्य म्हणतात की, जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त काळ दुसऱ्याच्या घरी राहिलात, तर तुमचा आदर कमी होतो. तुम्ही त्यांच्या कितीही जवळचे असलात तरी, जर तुम्ही त्यांच्या घरी जास्त काळ राहिलात, तर तुमच्या उपस्थितीमुळे त्यांना थोडं अस्वस्थ वाटू लागेल. तसेच, त्यांच्याबद्दलचा तुमचा आदरही कमी होईल. म्हणून, त्यांच्या घरी जास्त वेळ घालवणे योग्य नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेहमी सर्वांशी नम्रपणे आणि सौजन्याने बोलावं. म्हणजे, वाईट बोलणे टाळावे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही…)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in