• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजणांना व नातेवाईकांना पाठवा ‘या’ खास शुभेच्छा

August 17, 2026 by admin Leave a Comment


श्रावण महिना सुरू होताच एकामागून एक सण येत असतात. कारण हा महिनाच सणउत्सवांचा तसेच महादेवाच्या खास भक्तीचा असतो. दरवर्षी प्रमाणे श्रावण महिन्याच्या पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. तर आज 17 ऑगस्ट 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेव आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी नागदेवाची पूजा केल्याने कालसर्प दोष आणि भीती यांच्या वाईट प्रभावांपासून मुक्ती मिळते. तर आजच्या दिवशी नागपंचमीला शिव आणि साध्य योगाचा एक दुर्मिळ संयोग तयार होत आहे. असे मानले जाते की या योगादरम्यान केलेल्या कर्मांचे फळ शुभ असते. चला तर मग आपल्या प्रियजणांना व नातेवाईकांना या नागपंचमीचे शुभेच्छा संदेश, मेसेज पाठवून हा सण खास पद्धतीने साजरा करूयात.

नागपंचमी निमित्त आपल्या खास लोकांना पाठवा या शुभेच्छा

1. मुखाने ॐ नमः शिवाय म्हणा, नागदेवतेचे स्मरण करा, तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या मंगलमय शुभेच्छा!

2. वारूळा जाऊया, नागोबाला पुजूया, नागपंचमीच्या सणाला गोड गोड खाऊया! नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.

3. वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळ गाई गोड गाणी
नागपंचमीच्या शुभदिनी सुख-समृद्धी मिळो सर्वांना जीवनी
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

4. रक्षण करूया नागराजाचे, जतन करू या निसर्गदेवतेचे
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

5. महादेवांच्या चरणी केलेली भक्ती स्वीकारली जावो,
नागदेवतेच्या आशीर्वादाने आपल्या कुटुंबाचे सदैव रक्षण होवो. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

6. श्रावणात कोकिळ गाई गोड गाणी
नागपंचमीच्या शुभदिनी सुख-समृद्धी मिळो सर्वांना जीवनी
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

7.ॐ नमः शिवाय!
नागपंचमी आणि श्रावणी सोमवारच्या मंगलमय शुभेच्छा!

8. नागपंचमीच्या दिवशी
तुमच्यावर नागदेवतांची
सदैव कृपा असू दे
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

9. भगवान शिवांच्या कृपेने आणि नागदेवतेच्या आशीर्वादाने,
आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होवोत.
घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो.
हर हर महादेव! ॐ नमः शिवाय! नागपंचमी सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

10. नागपंचमीचा खास सण आणि श्रावणी सोमवारचा हा पवित्र दिवस, आपल्या जीवनात मंगल घेऊन येवो. नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in