• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

धर्मेंद्र यांच्या मोठ्या भावाची गोळ्या झाडून केलेली हत्या… आजही मोकाट फिरतोय गुन्हेगार, नेमकं काय घडलेलं?

April 26, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. अनेक सिनेमांमध्ये आपला अनोखा अंदाज दाखवत धर्मेंद्र यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. लोकप्रिय अभिनेते म्हणून धर्मेंद्र आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत. पण त्यांच्या मोठ्या भावाबद्दल फार कोणाला माहिती नाही. धर्मेंद्र यांच्या मोठ्या भावाला सर्वांसमोर गोळ्या झाडून मारुन टाकण्यात आलं होतं. धर्मेंद्र यांच्या मोठ्या भावाचं नाव विरेंद्र सिंग असं होतं. विरेंद्र आज जिवंत असते, तर ते देखील बॉलिवूडचे लोकप्रिय सेलिब्रिटी असते. सांगायचं झालं तर, धर्मेंद्र हिंदी सिनेविश्वात स्वतःची ओळख निर्माण करत होते, तर विरेंद्र यांचा पंजाबी सिने विश्वात बोलबाला होता… पण एक दिवस असा आला जेव्हा सिनेमाचीच शुटिंग करत असताना, विरेंद्र यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

विरेंद्र सिंग यांचं खरं नाव

सुभाष ढडवाल असं विरेंद्र यांचं नाव होतं. पण त्यांची ओळख मात्र विरेंद्र सिंग म्हणून होती. धर्मेंद्र आणि विरेंद्र यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघे चूलत भाऊ होते… विरेंद्र सिंग यांच्यासोबत धर्मेंद्र यांनी काम केलं होतं… विरेंद्र आज जिवंत असते, तर त्यांचं नाव देखील बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांच्या यादीत अव्वल स्थानी असतं.

विरेंद्र सिंग यांचं हीट सिनेमे…

विरेंद्र सिंग यांनी 1975 मध्ये अभिनय विश्वात पदार्पण केलं. त्यांनी पंजाबी सिनेमा ‘तेरी मेरी एक जिन्दडी’ सिनेमातून अभिनय विश्वात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. ‘बंटवारा’, ‘बलबीरो भाभी’, ‘दुश्मनी दी आग’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली.

त्यानंतर विरेंद्र यांनी हिंदी कलाविश्वात देखील पदार्पण केलं. विरेंद्र यांनी स्वतःला फक्त अभिनयापर्यंत मर्यादीत ठेवलं नाही तर, त्यांनी दिग्दर्शनाकडे देखील आपला मोर्चा वळवला. विरेंद्र यांनी 12 वर्षांच्या करियरमध्ये तब्बल 25 सिनेमे केले. त्यांनी फक्त सिनेमे केले नाहीत, तर त्यांचे सिनेमे हीट देखील ठरले.

कशी झाली हत्या?

डिसेंबर 1988 मध्ये विरेंद्र लुधियाना येथे आगामी सिनेमा ‘जट्ट ते जमीन’ सिनेमाची शुटिंग करत होते. तेव्हा अचानक त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि काही कळण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. विरेंद्र यांच्या निधनानंतर इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली होती. हत्या झाली तेव्हा विरेंद्र फक्त 40 वर्षांचे होते. विरेंद्र यांच्या हत्येचं रहस्य आजही समोर आलेलं नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकप्रियताच विरेंद्र यांच्या जीवावर बेतली… तर काही लोकांचं असं देखील म्हणणं आहे की, दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात विरेंद्र यांचं निधन झालं.

धर्मेंद्र यांचं निधन

धर्मेंद्र यांनी देखील वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 24 नोव्हेंबर 2025 मध्ये धर्मेंद्र यांचं निधन झालं. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. तर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘आज काही शॉट्स फायर देखील होतील, घटनेआधीच व्हाईट हाऊस प्रवक्त्या लेव्हीट यांची भविष्यवाणी चर्चेत!
  • IPL 2026 : या टीममध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव सारखे कॅप्टन्स आहेत, ते का..एक मोठा प्लेयर हार्दिक पंड्याच्या बाजूने बोलला
  • चेन्नई सुपर किंग्स संघात दाखल होताच संजू सॅमसनने मोडला सुरेश रैनाचा विक्रम, काय ते जाणून घ्या
  • रिक्षाचालकांवर मराठी भाषा सक्तीच्या वादावर विशाल कोटियन म्हणाला, “महाराष्ट्रात राहायचं असेल तर..”
  • साप खरंच आपल्या जोडीदाराच्या मृत्यूचा बदला घेतात का? 99 टक्के लोकांना माहीत नसते हे सत्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in