• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर CJP वादात; भाजप नेत्याकडून ‘तो’ व्हिडिओ पोस्ट, VIDEO

July 27, 2026 by admin Leave a Comment


भाजप खासदार धर्मेंद्र प्रधान यांना कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनासमोर झुकावं लागलं. महिनाभराच्या आंदोलनानंतर प्रधान हे केंद्रीय शिक्षणमंत्रिपदावरून पायउतार झाले. 12 वर्षांच्या काळात पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळातील पहिल्या नेत्याने मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलनाचं लोण संपूर्ण देशभर पसरलं होतं. त्यामुळे सरकारने आंदोलक तरुणांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांनी एका हॉटेलमध्ये आंनद व्यक्त केला. आंदोलकांचा नाचतानाचा व्हिडिओ शेअर करत भारतीय जनता पक्षाचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, प्रत्येक व्यक्तीला मेहनत केल्यानंतर आराम करणे आणि आनंद, जल्लोष व्यक्त करण्याचा अधिकार आहे. परंतु जल्लोष व्यक्त करण्याची वेळ आणि ठिकाण महत्त्वाचं असतं’. त्यांनी पुढे म्हटलं की, ‘कोणतेही आंदोलन हे न्यायाची लढाई म्हणून सादर केले जाते. जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांनी आंदोलन हे नीट पेपरफुटीनंतर 21 जणांनी आत्महत्या केल्याने पुकारलं. परंतु या आंदोलनानंतर आंदोलकांच्या नाचणे आणि जल्लोषाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यांचा व्हायरल होणारा व्हिडिओ असंवेदनशील आहे. 21 जणांच्या आत्महत्या प्रकरणी काही जण दु:ख व्यक्त करत आहे. दुसरीकडे काही जण जल्लोष करत आहे’.

 

Everyone deserves to unwind and celebrate after a hard day’s work. But there is a time and a place for it.

When a movement is presented as a fight for justice for students, including those whose deaths by suicide are invoked as its moral foundation, scenes of dancing and what… pic.twitter.com/vIz35PtYcn

— Amit Malviya (@amitmalviya) July 27, 2026

भाजप नेत्याने पोस्टमध्ये लिहिलं की, ‘काही दिवसांपूर्वी मंचावरून विजेता दहिया यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता अभिजीत दीपके यांच्या ग्रुपमधील सौरव, रांका आणि इतर सदस्य जल्लोष करताना दिसत आहे. त्यांचा जल्लोष करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावरून व्हायरल होत आहे.

‘या व्हायरल व्हिडिओनंतर हजारो तरुणांमध्ये काय संदेश जाईल. आंदोलनात अनेक जण शिक्षण व्यवस्थेत सुधारणा व्हावी, यासाठी अनेकांनी सहभाग नोंदवला होता. आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांची दिशाभूल करण्यात आल्याचे समजून येईल. विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करणारे आंदोलक हे आंदोलन संपल्यानंतर आनंद व्यक्त करत नाचगाणी करत आहेत. या आंदोलनात प्रामाणिकपणे सहभागी झालेल्या आंदोलकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांच्या भावनांचा वापर हा राजकीय प्रचारासाठी केला जात आहे, असा प्रश्न विचारण्याचा हक्क आहे, असेही मालवीय यांनी म्हटलं.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sunil Gavaskar: भारतात हे घडलं असतं तर…गावस्कर ICCवर संतापलं, एका झटक्यात केली पोलखोल
  • मोठी बातमी! नागपूर हादरलं, काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार
  • Sugar Rate : आता नो टेन्शन! सरकारच्या त्या निर्णयाने साखरचे दर धडाम, खरेदीदारांना मोठा दिलासा
  • LPG Cylinder: मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, आता LPG सिलिंडरची चिंता मिटली, दर कमी होणार?
  • Rohit Pawar On MPSC Paper Leak : MPSC कडून भरती प्रक्रियाच रद्द,पेपर फुटीवर रोहित पवार जे बोलले ते खरं ठरलं, त्यांची पहिली प्रतिक्रिया

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in