• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सयाजी शिंदे यांची मोठी प्रतिक्रिया, विद्यार्थ्यांबद्दल म्हणाले…

July 22, 2026 by admin Leave a Comment


विद्यार्थी त्यांच्या हक्कांसाठी, न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर उतरले आहे. पण त्यांच्यावर लाठीचार्ज होत असल्यामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेल्या तरुणांची प्रमुख मागणी केंद्रिय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणा साझी पहिजे… अशी आहे. अशात विद्यार्थ्यांच्या समर्थासाठी संपूर्ण देश पुढे आलं आहे. राजकीय पक्ष, सेलिब्रिटी देखील तरुणांचं समर्थन करत, लढा जारी ठेवा असं सांगत असताना, मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी केंद्रिय धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर मोठी प्रतिक्रिया दिला आहे. शिवाय मुलांना मारायला नको होतं.. असं देखील सयाजी शिंदे म्हणाले आहेत.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, तरुणांवर झालेल्या लाठीचारावर सयाजी शिंदे म्हणाले, ‘आपल्याच माणसाने आपल्यावरच लाठीचार्ज करणं योग्य नाही. शेवटी ही आपलीच माणसं आहेत… ती आपल्या चांगल्यासाठी, भविष्यासाठी भांडत आहेत. ही लोकशाही आहे, त्यामुळे अशा पद्धतीने लाठीचार्ज नव्हता करायला पाहिजे. सरकारने विद्यार्थ्यांचा विश्वास निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे, म्हणजे आता सध्या जी परिस्थिती आहे, ती टळेल…’

पुढे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सयाजी शिंदे म्हणाले, ‘राजीनामा म्हणजे सिस्टिम बदलली पाहिजे. ती व्यक्ती बदलली पाहिजे. कारण त्यांनी काय होत आहे, याकडे लक्ष दिलं नाही. चांगली सर्व्हिस मिळावी म्हणून आपण सरकारला निवडून देतो, त्यामुळे, त्यांनी देखील तसं वागलं पाहिजे, मग असे आंदोलन कधीच होणार नाही…’ असं देखील सयाजी शिंदे म्हणाले.

सोनम वांगचुक यांच्यावर सयाजी शिंदे यांची प्रतिक्रिया

यावेळी सयाजी शिंदे यांनी सोनम वांगचुक यांच्या कामाचं देखील कौतुक केलं. ‘मी सोनम वांगचुक यांना खरंच मानतो, अशी माणसं फार दुर्मिळ आहेत. मी त्यांना प्रत्यक्ष भेटलोय, बोललोय, आमचे विचार देखील जुळले… असं वाटतं अशी माणसं आपल्यापेक्षा चांगली आहेत आणि अशा माणसांची आपल्या देशाला खरंच गरज आहे… सरकारने या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा… सरकार आपलं असतं, आपण निवडून दिलेलं असतं… त्यामुळे असं चालणार नाही ना…’, असं देखील सयाजी शिंदे म्हणाले.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • खराब कोलेस्ट्रॉल वाढलंय? स्वयंपाकघरातील ‘हा’ मसाला ठरू शकतो फायदेशीर; तज्ञांनी सांगितली वापरण्याची योग्य पद्धत
  • मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या…
  • थलपती विजय यांच्या पत्नीने घटस्फोट मागे घेतल्यानंतर आईबद्दल मुलगा म्हणाला, ती 24 तास फक्त..
  • Rupali Chakankar : बाई एवढी माया आली कुठून, 35 कोटी रुपये..रुपाली चाकणकर यांच्या नव्या The Nines हॉटेलवर काँग्रेस नेत्याचा सवाल
  • Donald Trump: ट्रम्पची मोठी कारवाई, चार भारतीय कंपन्यांना एका झटक्यात दणका, अचानक असं का केलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in