• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

धर्मेंद्र प्रधान यांची अमित शाहांसोबत तब्बल तीन तास बैठक, बैठकीत नेमकं काय घडलं?

July 20, 2026 by admin Leave a Comment


मोठी बातमी समोर येत आहे, आज राजधानी दिल्लीमध्ये वातावरण चांगलंच तापलं आहे.  कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने आज थेट संसद भवनावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आल्याने आंदोलनस्थळी मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी आंदोलकांसाठी बॅडिकेड लावले होते, परंतु आंदोलक हे बॅडिकेड ओलांडून संसदेच्या दिशेनं पुढे आले, त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी आश्रुधुराचा मारा केला, तसेच लाठीचार्ज देखील करण्यात आला. हे सर्व घडत असताना दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी मंत्री जे. पी. नड्डा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

या भेटीदरम्यान कॉकोरच जनता पार्टीने सरकारकडे तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. ज्यामध्ये  सोनम वांगचूक यांच्या आंदोलनात अडथळा न आणता त्यांची सुटका करावी, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, किंवा त्यांना पदावरून काढून टाकावे आणि तिसरी महत्त्वाची मागणी म्हणजे नीट परीक्षा प्रकरणात ज्या -ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत देण्यात यावी.

दरम्यान दुसरीकडे या सर्व घडामोडी घडत असताना सरकारदरबारी देखील हालचालींना वेग आला आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तीन तास बैठक सुरू होती.  सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर चर्चा झाली, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला.

आंदोलक आक्रमक 

दरम्यान आंदोलक आक्रमक झाले आहे, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे, त्यासाठीच आज आंदोलकांनी संसद भवनावर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं आंदोलक सहभागी झाले होते. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून आंदोलकांवर आश्रुधुराचा मारा देखील करण्यात आला आहे. तर दुसरीकडे काढी लाठीचार्जच्या देखील घटना घडल्या. विरोधी पक्षांनी आता रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पांठिबा द्यावा अशी मागणी कॉकरोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांनी केली.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • टॉयलेट सीटखाली लपला होता ६ फूटाचा कोब्रा,सीट तोडताच फुत्कार करत बाहेर आला..
  • Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
  • Woman Asia Cup : भारतीय महिलांची विजयी सलामी, थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय
  • वांद्र्यात भरधाव इनोव्हाने चिरडल्याने नऊ वर्षांचा मुलाचा मृत्यू,महिला चालकास अटक
  • प्रसिद्ध मराठी गायिकेवर गुन्हा दाखल, लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in