• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यासह या तीन मागण्यांसाठी कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन; तिसरी मागणी काय?

July 20, 2026 by admin Leave a Comment


कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलक नीट पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले आहेत. प्रमुख तीन मागण्यांसाठी सीजेपी रस्त्यावर उतरली आहे. हजारो आंदोलकांची गर्दी आंदोलनासाठी जमली, अशात जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. दरम्यान डीसीपी सचिन शर्मा यांनी सांगितल्यानुसार, पावसाळी अधिवेश आणि आंदोलनाची तिव्रता पाहता दिल्लीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता लागू करण्यात आली आहे. या कायद्याअंतर्गत, पाच पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र जमा होऊ शकत नाहीत, विरोध किंवा आंदोलन करु शकत नाहीत. याकाळात धरणे आंदोलनं करण्यावर पूर्ण बंदी असेल. केवळ जंतर-मंतर येथेच शांततापूर्ण निदर्शनांना परवानगी देण्यात आली असून त्यासाठीही पूर्वपरवानगी घेणं देखील आवश्यक असणार आहे. असं देखील सांगण्यात आलं आहे… जर कोणी आदेशांचं उल्लंघन केलं तर, त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल…

कॉकरोच जनता पार्टीने तीन मोठ्या मुद्द्यांच्या विरोधात केलं आहे आंदोलन

1. नीट परीक्षेमध्ये झालेला गैरप्रकार, प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटना आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील अनियमिततांबाबत चौकशी व जबाबदारी निश्चित करण्याची मागणी.

2. परीक्षेत झालेल्या मोठ्या प्रमाणावरील गैरप्रकारांमुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

3. देशातील वाढती बेरोजगारी, सरकारी भरती परीक्षांच्या निकालांमधील विलंब आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत मांडलेला खेळ… या मुद्द्यांवर सरकारला घेरण्यात आलं आहे.

जंतर – मंतरवर थ्री – टियर सुरक्षा ग्रिड

सुरक्षा व्यवस्थेची काळजी घेत, जंतर – मंतर, पार्लियामेंट स्ट्रीट, सेंट्रल विस्टा, कनॉट प्लेस आणि शंकर चौक या स्थनकांवर देखील थ्री – टियर सुरक्षा ग्रिड बनवण्यात आलं आहे. यामध्ये दिल्ली यात दिल्ली पोलिसांच्या दोन स्तरांतील आणि निमलष्करी दलांच्या एका स्तरातील जवानांचा समावेश आहे. कोणतीही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास रॅपिड रिस्पॉन्स टीम देखील तैनात करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, CJP च्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी अनेक पक्षांच्या नेत्यांनी उपस्थिती दर्शवली. आम आदमी पार्टीचे मनीष सिसोदिया, संजय सिंह, आजाद समाज पार्टीचे प्रमुख आणि यूपीचे नगीना मतदारसंघाचे सांसद चंद्रशेखर यांच्यासह अभिनेते प्रकाश राज, शबाना आझमी आणि सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली देखील उपस्थित होत्या.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जेवण केलं, ॲसिडिटीचा त्रास झाला अन् अचानक… आदिती तटकरेंच्या PRO सोबत नेमकं काय घडलं?
  • मनोज जरांगे पाटलांवर काही मंत्री नाराज, आता वातावरण तापणार; केली मोठी मागणी
  • Amit Thackeray | पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अमित ठाकरेंचा आक्रमक पवित्रा, छत्रपती शिवरायांशेजारील मोदींचा फोटो हटवला
  • मोदींचा फोटो हटवल्याने वातावरण तापलं , अमित ठाकरेंवर तातडीने …भाजपाची मोठी मागणी!
  • Govinda : गोविंदाच्या अफेअरमुळे त्यांच्या कुटुंबात घडली एक चांगली गोष्ट, सेलिब्रेशनचे फोटो पाहून चाहते खुश, पण..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in