• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

धमक्या, मॉर्फ केलेले फोटो अन्..; मुंबई पोलिसांची व्हॅन थांबवणाऱ्या तरुणीने अखेर उचललं मोठं पाऊल

July 27, 2026 by admin Leave a Comment


मुंबईतील दादर इथं विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान थेट पोलिसांच्या व्हॅनसमोर उभी राहणारी 27 वर्षांची मॉडेल रिया यादव अहिर क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलीस व्हॅनमधून नेत असताना रिया थेट गाडीसमोर उभी राहिली. तिने एकटीने ती व्हॅनला पुढे जाण्यापासून थांबवलं होतं. एकीकडे रियाच्या धाडसाचं कौतुक होत असताना दुसरीकडे तिला ऑनलाइन धमक्या, ट्रोलिंग आणि छळाचाही सामना करावा लागत आहे. सातत्याने होणाऱ्या या ट्रोलिंगविरोधात अखेर तिने महाराष्ट्र सायबर सेलकडे तक्रार केली आहे. रियाने शनिवारी सायबर सेलकडे ऑनलाइन तक्रार दाखल केली असून याप्रकरणी एफआयआर नोंदवण्याची मागणी करण्यासाठी ती आज (सोमवार) सायबर सेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.

नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत जंतर-मंतर याठिकाणी कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आणि तरुणांचं आंदोलन सुरू होतं. या आंदोलनाच्या समर्थनार्थ देशात इतरही ठिकाणी काही निदर्शनं झाली. 22 जुलै 2026 रोजी मुंबईतील दादर परिसरातही आंदोलनासाठी विद्यार्थी आणि तरुण जमले होते. यावेळी रिया अहिरने थेट पोलिसांची व्हॅन अडवून सर्वांचं लक्ष वेधलं होतं. पोलीस व्हॅनमधील आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची तिने सुटका करून घेतली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by ʀʜɪʏᴀ ʏᴀᴅᴀᴠ (@rhiyaahir)

सायबर सेलकडे दाखल केलेल्या तक्रारीबद्दल रिया म्हणाली, “आंदोलनातील माझे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून मला सतत अपमानास्पद टिप्पण्यांना आणि धमक्यांना सामोरं जावं लागत आहे. हे जरी सध्या ऑनलाइन असलं तरी त्याचं रुपांतर कुठल्याही मोठ्या गोष्टीत होऊ शकतं. माझ्या आईवडिलांवर याचा परिणाम होऊ नये, अशी माझी इच्छा आहे. मी आंदोलकांच्या पाठिशी उभी राहिली तरी आता मला स्वत:साठीही उभं राहायला हवं. गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर मला खूप ट्रोल केलं जातंय. इतकंच नव्हे तर काहींनी मला अडल्ट कंटेंट क्रिएटर म्हणून खोटं दाखवलंय. ज्यांचे फॉलोअर्स खूप जास्त आहेत, अशा काही क्रिएटर्सनी माझा एक्स्क्लुझिव्ह पॉर्नोग्राफिक कंटेंट मिळवल्याचा खोटा आरोप करत माझे बिकिनीमधील एडिट केलेले फोटो अपलोड केले आहेत.”

“मी इन्स्टाग्रामवरील सबस्क्राइबर्सना माझे असे बोल्ड फोटो विकून लाखो रुपये कमावते, असा खोटा आरोप माझ्यावर केला जातोय. माझं कोणतंही बँक खातं माझ्या इन्स्टाग्रामशी जोडलेलं नाही. मी अशा कोणत्याही कंटेंटमधून एक रुपयाही कमावलेला नाही. भविष्यात असे अनेक खोटे आरोप होण्याची शक्यता असल्याने मी कायदेशीर मार्ग अवलंबला आहे. मला हे वेळीच थांबवायचं आहे. सतत छळ करणाऱ्यांना, धमकावणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे”, अशी प्रतिक्रिया रियाने दिली आहे. तर पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी रियाच्या तक्रारीची तपासणी सुरू असल्याची माहिती दिली आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sunil Gavaskar: भारतात हे घडलं असतं तर…गावस्कर ICCवर संतापलं, एका झटक्यात केली पोलखोल
  • मोठी बातमी! नागपूर हादरलं, काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार
  • Sugar Rate : आता नो टेन्शन! सरकारच्या त्या निर्णयाने साखरचे दर धडाम, खरेदीदारांना मोठा दिलासा
  • LPG Cylinder: मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, आता LPG सिलिंडरची चिंता मिटली, दर कमी होणार?
  • Rohit Pawar On MPSC Paper Leak : MPSC कडून भरती प्रक्रियाच रद्द,पेपर फुटीवर रोहित पवार जे बोलले ते खरं ठरलं, त्यांची पहिली प्रतिक्रिया

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in