
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना अपात्रता आणि राजकीय पक्ष आणि निवडणूक चिन्ह यावर मॅरेथॉन सुनावणी सुरु आहे. या सुनावणीत गेले पाच दिवस ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल युक्तीवाद करत होते. आता शिवसेना उद्धव ठाकरे यांचेच वकील देवदत्त कामत यांचा युक्तीवाद सुरु आहे. देवदत्त कामत यांनी जर निवडणूक चिन्ह कोणाकडे द्यायचे याचा निर्णय होत असेल तर ते चिन्ह गोठवा अशी मागणी वकील देवदत्त कामत यांनी केले आहे. विशेष म्हणजे काल कपिल सिब्बल यांनी देखील निवडणूक चिन्ह गोठवण्याची मागणी केली होती.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply