• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

धक्कादायक! नागपूरच्या प्रसिद्ध अशोका रेस्टॉरंटच्या सूपमध्ये मेलेलं झुरळ; FDA कडून थेट परवाना निलंबित!

July 20, 2026 by admin Leave a Comment


नागपूरमधील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये ग्राहकाला दिलेल्या सूपमध्ये मेलेले झुरळ आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणानंतर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तातडीने कारवाई करत संबंधित रेस्टॉरंटवर धाड टाकली असून, तपासात गंभीर अस्वच्छता आढळल्याने रेस्टॉरंटचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला आहे.

नागपूरमधील अशोका रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी आलेल्या एका ग्राहकाला सूपमध्ये मेलेले झुरळ आढळले. यानंतर संबंधित ग्राहकाने अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच FDA च्या अधिकाऱ्यांनी तातडीने अशोका रेस्टॉरंटवर छापा टाकून तपास सुरू केला. तपासादरम्यान हॉटेलच्या किचनमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले.

या गंभीर त्रुटींची दखल घेत FDA ने संबंधित रेस्टॉरंटचा परवाना तात्पुरता निलंबित केला आहे. हॉटेल व्यवस्थापनाने सर्व त्रुटी दूर करून अन्न सुरक्षा नियमांचे पालन केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे नागपूरातील हॉटेल्समधील अन्न सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, ग्राहकांनीही अन्नाच्या गुणवत्तेबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘अभिनेत्याशी लग्न म्हणजे…’ अर्शद वारसीशी लग्नाआधी जया बच्चन यांनी मारियाला दिला होता इशारा
  • Manoj Jarange Patil: आंदोलकांची गैरसोय होऊ नये म्हणून शेतकऱ्याने उचललं मोठं पाऊल, शेतातलं पिकच… होतंय कौतुक
  • Sanjay Raut Meet Raj Thackeray | राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर संजय राऊत दाखल; बंद दाराआड तासभर चर्चा, नेमकं काय शिजतंय?
  • Aditi Tatkare PRO: धक्कादायक! आदिती तटकरे यांच्या पीआरओचा अचानक मृत्यू; नेमकं काय घडलं?
  • E20 बाबत मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाने पेट्रोलमधील इथेनॉलच्या टक्केवारीची याचिका…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in