• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दोघे रेल्वेत नोकरीला होते, पण..हॉटेलच्या रुम नंबर 302 मध्ये शिवानी-किरणच्या प्रेमाचा मन सून्न करणारा शेवट

August 19, 2026 by admin Leave a Comment


नागपुरातील मनीषनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये तरुणीची हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 28 वर्षीय शिवानी गजभिये असं मृत तरुणीचं नाव आहे, तर किरण आत्राम असं जखमी इसमाचं नाव आहे. हॉटेलच्या रूम क्रमांक ३०२ मध्ये २८ वर्षीय शिवानी गजभिये आणि किरण आत्राम हे दोघे रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. शिवानीच्या शरीरावर चाकूचे अनेक घाव असल्याने तिचा मृत्यू झाला, तर किरण गंभीर जखमी झाला आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास रूममधून किंकाळ्या ऐकू आल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. रूममध्ये दोघेही रक्तबंबाळ अवस्थेत पडले होते, तर बाजूलाच चाकू आढळून आला.

दोघेही रेल्वे कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती आहे. लग्नाच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. वादानंतर किरणने शिवानीवर चाकूने हल्ला केला आणि त्यानंतर स्वतःलाही जखमी केल्याचा प्राथमिक संशय आहे. बेलतरोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही रुग्णालयात हलवलं. शिवानीचा मृत्यू झाला असून किरणवर उपचार सुरू आहेत. या रक्तरंजित घटनेमागचं नेमकं कारण काय, हल्ला पूर्वनियोजित होता का, याचा बेलतरोडी पोलीस तपास करत आहेत.

सरोगसीच्या माध्यमातून मुलं देतो सांगून फसवणूक

धाराशिवमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. सरोगसीच्या माध्यमातून मुलं देतो’ म्हणत तब्बल ४७ लाख ८८ हजारांची फसवणूक केली. मुलं देण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केल्याचा आरोप. या प्रकरणातील फिर्यादीला मुली आहेत, मुलगा नसल्याने सरोगसीच्या माध्यमातून मुलं देण्याचे आमिष दाखवून केली फसवणूक. प्रकरण उघडकीस आल्यानंतर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची आरोपींची धमकी. आधी रोख आणि ऑनलाइन पद्धतीने ४७ लाख ८८ हजार रुपये उकळल्याचा आरोप.

लैंगिक अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचाही आरोप. धनंजय मदने यांच्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल. २०२० ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पैसे घेतल्याचा फिर्यादीत उल्लेख. २५ लाख ८८ हजार रोख, तर २२ लाख रुपये ऑनलाइन घेतल्याचा आरोप. तुळजापूर, मोहोळ, तेर आणि पुणे येथील आरोपींचा समावेश.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in