• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘देसी ब्लिंग’ फेम सतीश सनपालची सर्व बँक खाती गोठवली; 40 किलो सोनं असल्याचा पत्नीचा दावा

August 5, 2026 by admin Leave a Comment


नेटफ्लिक्सवरील ‘देसी ब्लिंग’ या रिअॅलिटी शोमधून अत्यंत आलिशान लाइफस्टाइलचं प्रदर्शन करणारे प्रसिद्ध उद्योगपती सतीश सनपाल यांच्यावर मोठी कारवाई झाली आहे. संयुक्त अरब अमिरातीची मनी लाँडरिंगविरोधी संस्था ‘फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट’ने (FIU) सतीश सनपाल आणि त्यांची पत्नी तंबिदा सनपाल यांची सर्व बँक खाती गोठवण्याचे आदेश दिले आहेत. या हाय-प्रोफाइल जोडप्याशी संबंधित कंपन्यांच्या मालमत्तेवर तात्पुरती ही कारवाई करण्यात आली आहे. हा आदेश 30 दिवसांसाठी लागू राहील, त्यानंतर गरज भासल्यास एफआययू मुदतवाढीची मागणी करू शकते. मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये किराणा दुकान चालवणाऱ्या सतीश सनपाल यांनी दुबईत जाऊन तब्बल 3 अब्ज डॉलर्सची ‘अनॅक्स होल्डिंग’ ही कंपनी उभारली होती. ‘देसी ब्लिंग’ या शोमध्ये दोघांनी त्यांच्या श्रीमंतचं प्रदर्शन केलं होतं. “माझ्याकडे 40 किलो सोनं आहे. सतीशला सोनं खरेदी करायला खूप आवडतं. दरवर्षी धनत्रयोदशीला तो मला सुमारे 3 किलो सोनं देतो”, असं तंबिदाने शोमध्ये म्हटलं होतं.

संयुक्त अरब अमिरातीमधील अधिकाऱ्यांनी मनी लाँड्रिंगच्या तपासाचा भाग म्हणून सनपाल यांची मालमत्ता गोठवली आहे. नोटीसमध्ये अनॅक्स कॅपिटल असेट मॅनेजमेंट कंपनी, अनॅक्स कॅपिटल फायनान्शियल मार्केट एलएलसी, अनॅक्स होल्डिंग एफझेडसीओ आणि एसएसबी बाजार जनरल ट्रेंडिंग एलएलसी यांचा समावेश आहे. मोल्यवान रत्नांचा व्यवसाय करणारी एसएसबी ही कंपनी 2015 मध्ये स्थापन झाली होती. तर इतर तीन संस्थांची स्थापना 2023 ते 2024 दरम्यान झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tabinda Sanpal (@tabinda.sanpal)

‘देसी ब्लिंग’ या शोमध्ये आपली श्रीमंती आणि आलिशान लाइफस्टाइलचं प्रदर्शन करताना हे सर्व अनेक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर मिळवण्याला दावा सनपाल यांनी केला होता. 41 वर्षीय सतीश सनपाल यांनी आठवी इयत्तेनंतर शाळा सोडली आणि वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी बिझनेसमध्ये प्रवेश केला. आईकडून 50 हजार रुपयांचं कर्ज घेऊन त्याने एक छोटं किराणा दुकान सुरू केलं होतं. मात्र हे दुकान फार काळ चाललं नाही म्हणून अखेर ते बंद करावं लागलं. जवळपास 11 वर्षांपूर्वी सतीश युएईमध्ये स्थायिक झाले. सुरुवातीला त्यांनी ग्राहकांना शेअर बाजारातील दलालांशी संपर्क साधून देण्यास मदत केली. नंतर त्यांनी तंत्रज्ञान, स्थावर मालमत्ता, हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रांमधील व्यवसायांमध्ये विस्तार केला. दुबईतील बुर्ज खलिफामधील भव्य अपार्टमेंट, रोल्स रॉइससह आलिशान गाड्यांचं मोठं कलेक्शन.. या सर्वांची झलक त्यांनी ‘देसी ब्लिंग’मध्ये दाखवली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सतीश सनपाल यांच्यावर मध्य प्रदेशात नऊ फौजदारी खटले दाखल आहेत. 2022 मध्ये त्यांच्याविरुद्ध लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तरी त्यांच्यावर दाखल झालेल्या एकाही खटल्यात त्यांना दोषी ठरवण्यात आलं नाही. “सतीश सनपाल यांनी 2020 पासून भारतात प्रवास केला नाही. या खटल्यांमध्ये त्यांच्याविरुद्ध कोणताही ठोस पुरावा नाही. एका प्रकरणात सह आरोपींची आधीच निर्दोष मुक्तता झाली आहे”, असं त्यांच्या वकिलांनी म्हटलंय.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारताचा बेस्ट PM कोण? अभिजीत दिपके यांच्या उत्तराने उंचावल्या भुवया, आवडत्या मुख्यमंत्र्याचं नावही सांगितलं
  • आशिष शेलार यांचे मुंबईतील शाळा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश
  • खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा
  • Govindan and Sunita Ahuja : गोविंदाने पत्नी सुनिताला पुन्हा केलं फॉलो, रुमर्ड गर्लफ्रेंडबाबत काय? फ्रेंडलिस्टमध्ये आहे का ?
  • मोठी बातमी! NIA ची देशभरात छापेमारी, पुणे शहरातही शिजत होता भयंकर कट? दहशतवाद प्रकरणात…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in