• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

July 21, 2026 by admin Leave a Comment


दिल्लीत CJP ने नीट पेपर फुट प्रकरणात शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी करीत आंदोलन केले. त्यानंतर २० जुलै रोजी संसदेवर मोर्चा नेला. या मोर्चा दरम्यान पोलीसांनी अमानुषपणे लाठीमार केल्याने सर्व स्तरातून केंद्र सरकारवर टीका होत आहे. एरव्ही भूमिका न घेणारे बॉलीवूड देखील या घटनेने ढवळून निघाले आहे. अभिनेत्री शबाना आझमी,नसीरउद्दीन शाह यांसारख्या दिग्गजांनी चिंता व्यक्त केली आहे. तर अनेक जणांना सोशल मीडियावर आपले मत मांडत टीका केली आहे. यात आता पॉप गायक Yo Yo Honey Singh याचाही समावेश झाला आहे.

दिल्लीत जंतर-मंतर येथे सोनम वांगचुक यांनी २१ दिवस उपोषण केल्यानंतरही सरकारने त्यांची दखल घेतली नाही. त्यानंतर २१ व्या दिवशी सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी उचलून सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांची पत्नी गीतांजली यांनी या सोनम वांगचुक यांना दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्याची मागणी केली. अखेर आज सोनम वांगचुक यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कॉक्रोच जनता पार्टीने सोनम वांगचुक यांना पोलिसांनी उचलल्यानंतरही २० जुलै रोजीचा मार्चा काढला.त्या मोर्चाला देशभरातून तरुणांचे जथ्येच्या जथ्ये दिल्लीत हजर झाले. या आंदोलनात पोलीसांनी बळाचा वापर करीत लाठीमार करुन हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. यात अनेक तरुण जण जखमी झाले आहे. एका तीन टर्मच्या आमदाराला तर पोलिसांनी उचलून फेकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या प्रकरणात आता अनेक कलाकारांनी आपली मते बिनधास्तपणे सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत. अभिनेत्री शबाना आझमी आणि प्रकाश राव यांनी उपोषणकर्ते अभिजीत दीपके यांची स्टेजवर जाऊन भेट घेतली. अभिनेते नसीरउद्दीन विद्यार्थ्यांना लाठीमार होत असताना दिल्लीतून आपल्या मुलासह हताशपणे हे दृश्य पाहात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यो यो हनी सिंह याने त्याच्या नव्या मूनलाईट गाण्याचा आपण टीझर पुढे ढकलत असल्याचे पोस्ट करत म्हटले आहे. ‘देश पहले गाणा बादमे …’ असे यो यो हनी सिंह याने आपले म्हणणे मांडताना म्हटले आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sugar prices : साखरेच्या भावात प्रचंड वाढ, किंमतीविरोधात ते एक वाक्य पडलं भारी…, सरकारी अधिकाऱ्याचं थेट तडकाफडकी निलंबन
  • खराब कोलेस्ट्रॉल वाढलंय? स्वयंपाकघरातील ‘हा’ मसाला ठरू शकतो फायदेशीर; तज्ञांनी सांगितली वापरण्याची योग्य पद्धत
  • मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या…
  • थलपती विजय यांच्या पत्नीने घटस्फोट मागे घेतल्यानंतर आईबद्दल मुलगा म्हणाला, ती 24 तास फक्त..
  • Rupali Chakankar : बाई एवढी माया आली कुठून, 35 कोटी रुपये..रुपाली चाकणकर यांच्या नव्या The Nines हॉटेलवर काँग्रेस नेत्याचा सवाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in