• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

देशाच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवरच हल्ला, स्थानकात झाली दगड फेक, प्रवासी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळाले…

July 20, 2026 by admin Leave a Comment


जींद आणि सोनीपत दरम्यान धावणाऱ्या देशाच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. स्थानकात या ट्रेनवर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्याची घटना घडल्याने प्रवाशांमध्ये अफरातफर माजली. त्यानंतर त्यांनी जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधून उड्या मारुन सुरक्षित जागा शोधल्याची घटना घडली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ जुलै रोजी हरयाणातील जींद रेल्वे स्थानकातून भारताच्या पहिल्या हायड्रोजन इंधनवर धावणाऱ्या ट्रेनला (नमो ग्रीन रेल) हिरवा झेंडा दाखवला होता. या ट्रेनच्या पहिल्याच दिवशी बिघाडाचा सामना करावा लागला होता. आता ट्रेनवर दगडफेक झाल्याची घटना घडल्याने आश्चर्यव्यक्त होत आहे.

येथे पाहा व्हिडीओ –

India’s first hydrogen powered train was attacked with stones and damaged. Anyone who vandalizes a national asset like this cannot hide behind the label of Students.
pic.twitter.com/ZQ4WgBNMCz

— Manish (@4evermanish) July 20, 2026

हायड्रोजन ट्रेनचे तंत्रज्ञान – भारत पाचवा देश

Hydrogen Train चे तंत्रज्ञान जगात जपान, जर्मनी, फ्रान्स आणि चीननंतर वापरणारा भारत पाचवा देश ठरला आहे. या ट्रेनचे तंत्रज्ञान हायड्रोजन इंधनावर असल्याने वीजेची बचत मोठ्या प्रमाणावर होत असते. ही ट्रेन जींद ते सोनीपत दरम्यान धावत असून ८९ किमीचे अंतर साधारण २ तासांत पूर्ण केले जात आहे. या प्रवासात १२ ते १४ स्थानक आहेत. ट्रेनचा प्रवास अत्यंत स्वस्त म्हटला जात आहे. प्रवाशांसाठी तिकीट दर सर्वसामान्य गाड्यांप्रमाणेच म्हणजेच किमान ५ ते कमाल २५ रुपयांपर्यंत ठेवण्यात आले आहेत.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दुबईत क्रेन चालवणाऱ्याला लाखोंनी पगार, भारतातल्या इंजिनिअरपेक्षाही…आकडा वाचून चकित व्हाल!
  • बाहेरून सरदार आले अन् मंत्री झाले, मी फक्त बघत बसलो… महायुतीच्या बड्या नेत्याने व्यक्त केली खदखद
  • केरळमध्ये बस कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे वृद्ध प्रवासी पडण्यापासून वाचले
  • Uday Samant On Manoj Jarange Protest : 24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत
  • Chanakya Niti : आयुष्यात या तीन चुका कधीच करू नका, येईल पश्चातापाची वेळ, चाणक्य काय सांगतात?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in