• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

देशांतर्गत क्रिकेट सुरू होण्याआधीच मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीने बाजी मारली, राजस्थान रॉयल्सचा मास्टर गळाला

August 22, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल स्पर्धेला आता सहा महिन्यांचा अवधी शिल्लक राहिला असून मार्च 2027 मध्ये स्पर्धा सुरू होईल. असं असताना फ्रेंचायझी आपला संघ बांधण्यासाठी धडपड करत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्सने एक मोठा डाव टाकला आहे. आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी झुबिन भरूचा यांची मुंबई इंडियन्सने टीमचे नवे डायरेक्टर ऑफ परफॉर्मन्स म्हणून नियुक्ती केली आहे. झुबिन भरूचा हे 2008च्या पहिल्या पर्वापासून राजस्थान रॉयल्स संघासोबत होते. त्यांनी या फ्रेंचायझीसोबत क्रिकेट ऑपरेशन्स संचालक आणि हाय परफॉर्मन्स संचालक अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. आता राजस्थान रॉयल्ससोबतचा प्रवास संपला असून मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीसाठी काम करणार आहेत. मुंबई इंडियन्सने दिलेल्या माहितीनुसार, भरूचा हे फ्रेंचायझीच्या संपूर्ण इकोसिस्टममध्ये खेळाडूंच्या कामगिरीवर आणि त्याच्या विकासावर लक्ष केंद्रीत करतील.

झुबिन भरूचा यांच्यात भारतीय युवा क्रिकेटमधील टॅलेंज शोधण्याची कला आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली जागतिक दर्जाचे खेळाडू तयार झाले आहे. यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, ध्रुव जुरेल आणि वैभव सूर्यवंशी यांच्या जडणघडणीत त्याचा मोलाचा वाटा आहे. झुबिन भरूचा मुंबई इंडियन्सचे नवीन डायरेक्टर ऑफ परफॉर्मन्स म्हणून भारतीय देशांतर्गत हंगामावर लक्ष ठेवून असतील. युवा खेळाडूंच्या कामगिरीवर पूर्ण वर्षभर लक्ष ठेवण्याचे काम करतील. म्हणजेच देशांतर्गत क्रिकेटचा नवा हंगाम सुरू होताच त्याचं काम सुरू होणार आहे. दुलीप ट्रॉफी स्पर्धेपासून त्यांच्या कामाला सुरूवात होणार आहे. इराणी कप, रणजी ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतून भविष्यातील खेळाडू शोधण्याचं काम करतील.

𝗠𝘂𝗺𝗯𝗮𝗶 𝗜𝗻𝗱𝗶𝗮𝗻𝘀 𝗮𝗽𝗽𝗼𝗶𝗻𝘁 𝗭𝘂𝗯𝗶𝗻 𝗕𝗵𝗮𝗿𝘂𝗰𝗵𝗮 𝗮𝘀 𝗗𝗶𝗿𝗲𝗰𝘁𝗼𝗿 𝗼𝗳 𝗣𝗲𝗿𝗳𝗼𝗿𝗺𝗮𝗻𝗰𝗲

Read more 👉 https://t.co/DbIcJ1weDD pic.twitter.com/BXN6rNvBdy

— Mumbai Indians (@mipaltan) August 22, 2026

झुबिन भरूचा हे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने, बॅटिंग कोच किरॉन पोलार्ड आणि बॉलिंग कोच लसिथ मलिंगसोबत काम करणार आहेत. झुबिन भरूचा हे फक्त आयपीएल पुरता काम करणार नाही. तर त्यांची जबाबदारी मुंबई इंडियन्सच्या जागतिक क्रिकेट इकोसिस्टममधील पुरूष आणि महिला अशा दोन्ही संघातील खेळाडूंच्या परफॉर्मन्स सुधारण्याची असेल. मुंबई इंडियन्सची कामगिरी मागच्या काही पर्वात निराशाजनक राहिली आहे. त्यात कर्णधार हार्दिक पांड्याला रिलीज करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे संघाची बांधणी करण्याची मोठी जबाबदारी झुबिन भरूचा यांच्यावर असणार आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in