• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

देवदर्शनाहून आल्या पण काळ कोपला, कार-क्रुझरचा भीषण अपघात, 2 महिलांचा मृत्यू; 14 भाविक महिला जखमी

June 7, 2026 by admin Leave a Comment


जळगावच्या जामनेर तालुक्यातील वाडी किल्ला गावाजवळ कार आणि क्रुझरचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात तब्बल 14 भाविक महिला जखमी झाल्या आहेत.

या भीषण अपघातात कारमधील दोन्ही महिलांचा मृत्यू झाला असून कारचालक गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दुसरीकडे क्रुझरमधील 13 महिला भाविक जखमी झाल्या आहेत. क्रुझरमधील महिला जामनेर तालुक्यातीलच मालदाभाडी गावातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.

कारमधील प्रवासी हे नाशिक येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

जखमींना जामनेर येथील तसेच परिसरातील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. देवदर्शनाहून परतत असताना हा अपघात झाल्याने हळहळ व्यक्तकेली जात आहे. सध्या सर्व जखमींवर उपचार सुरू असून लवकर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली जात आहे.

दरम्यान, या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. अपघातानंतर आजबूजाच्या लोकांनी तत्काळ पोलीस तसेच रुग्णवाहिकांना बोलावले. त्यानंतर जखमींना रुग्णालयात पाठवण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात
  • मनोज जरांगेंचा मोठा विजय? सरकारने थेट दिला शब्द, येत्या दोन-तीन दिवसांत… विखे पाटलांनी सांगून टाकलं!
  • Brahmastra 2 Update : रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये ‘सैयारा’ स्टारची एंट्री ! कधी सुरू होणार शूटिंग ?
  • महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिलासा: शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in