• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दुहेरी संकट, घराबाहेर निघणे टाळाच, प्रशासनाचा हाय अलर्ट, पुढील तास धोक्याचे..

April 16, 2026 by admin Leave a Comment


राज्यातील हवामानात मागील काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच कधी पाऊस तर उष्णता अशी स्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता वाढताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने नुकताच अत्यंत मोठा इशारा दिला. राज्यात पुढील चार दिवस उष्णतेची लाट येणार आहे. यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. शक्यतो उष्णतेच्या लाटेदरम्यान नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. मुंबईसोबतच राज्यात पुढील चार दिवस ऊष्णतेची लाट असणार आहे. 18 आणि 19 तारखेला पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली. उष्णतेच्या लाटेदरम्यान नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन भारतीय हवामान विभागाने केले. यासोबतच शक्यतो फार महत्वाचे काम असल्याशिवाय दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळणे अधिक फायदेशीर ठरेल.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील चार दिवस तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तापमान 40 ते 44 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. ज्यामुळे या उन्हात बाहेर पडले तर उष्णघाताची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी दुपारी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे.

मुंबईसह कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट वातावरण कायम राहणार आहे. दुपारच्या वेळेत उकाडा अधिक जाणवेल. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने आवाहन केले जात आहे. आरोग्य तज्ज्ञांनी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

भरपूर पाणी पिणे, हलके कपडे घालणे आणि थेट उन्हात जास्त वेळ न थांबणे, या गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. दरम्यान, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने उष्माघाताच्या घटनांना रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवली. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. उष्णता वाढल्याने वर्धा जिल्ह्यात आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. पुढील काही तासात तापमानात मोठी वाढ होऊ शकते. अनेक जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शून्य उत्पन्न असूनही ITR का भरावा? जाणून घ्या ‘झिरो ITR’ फाइल करण्याचे 5 मोठे फायदे
  • Mahakal Temple : उज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिरात आता भस्म आरतीसाठी भरावे लागणार इतके पैसे, ऑनलाइन बुकिंगच्यावेळेतही बदल
  • Eknath Shinde Shivsena : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठा राडा, सत्काराच्या कार्यक्रमात दोन गट भिडले
  • Sanjay Raut: सोडा हो, हे तर भाजपा शक्ती बिल, संजय राऊतांचा मोदी सरकारला तो खणखणीत इशारा, नारी शक्ती वंदन विधेयक खरंच बहुमतानं मंजूर होणार?
  • भारतात Eyebrows करण्याचा खर्च 50 रुपये, तर अमेरिकेत किती डॉलर मोजावे लागतात, किंमत जाणून बसेल झटका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in