• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दुधात मनुके भिजवून महिनाभर खाल्ल्यास काय होईल? फायदे जाणून व्हाल हैराण

May 20, 2026 by admin Leave a Comment


आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण स्वतःकडे लक्ष देत नाही आणि याचे परिणाम काही वर्षांनंतर दिसून येतात. व्यस्त वेळापत्रक, ऑफिसमधील काम, कुटुंबाची जबाबदारी… इत्यादी गोष्टींमुळे अनेक जण स्वतःच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करत नाहीत. अशात दुधात भिजवलेले मनुके आरोग्यास लाभदायक ठरतील… सांगायचं झालं तर, . बरेच लोक मनुका रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खातात. परंतु आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मनुके दुधात खाल्ल्याने अनेक फायदे होतात. तर जाणून घ्या दुधात मनुके भिजवून खाल्ल्याने कोणते फायदे होतात.

रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते : मनुकांमध्ये लोह आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. दररोज सकाळी मनुका खाल्ल्याने ॲनिमिया कमी होण्यास मदत होते. पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत करते.

पचनक्रिया सुधारते : मनुकांमध्ये असलेले फायबर बद्धकोष्ठतेची समस्या कमी करण्यास मदत करते. दुधात भिजवल्यानंतर ते मऊ होते, ज्यामुळे पचन सोपे होते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रिकाम्या पोटी मनुका खाल्ल्याने पोटातील चांगल्या जिवाणूंच्या वाढीस मदत होते.

हृदय आणि त्वचेच्या आरोग्यासाठीही चांगले : मनुकांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि आरोग्यदायी फॅट्स शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. तसेच ते कोरडी त्वचा, मुरुमे आणि डाग यांसारख्या समस्या कमी करतात आणि चेहऱ्याची चमक वाढवतात.

वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त : त्यातील उच्च फायबरच्या प्रमाणामुळे, हे मिश्रण तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे ठेवते. यामुळे जास्त खाण्याची प्रवृत्ती कमी होऊ शकते. म्हणून, जे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे.

सांगायचं झालं तर, काळे मनुके (Black Raisins) आरोग्यास अधिक लाभगदाय आहेत. यामध्ये लोह, फायबर, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्सचे उत्कृष्ट स्रोत आहेत. ज्यामुळे अनेक समस्य दूर होतात. डॉक्टर देखील मनुके खाण्याचा सल्ला देतात. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे, कोणत्याही पदार्थाचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, त्याचे सेवन प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करणे सर्वोत्तम आहे.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात
  • मनोज जरांगेंचा मोठा विजय? सरकारने थेट दिला शब्द, येत्या दोन-तीन दिवसांत… विखे पाटलांनी सांगून टाकलं!
  • Brahmastra 2 Update : रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये ‘सैयारा’ स्टारची एंट्री ! कधी सुरू होणार शूटिंग ?
  • महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिलासा: शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in