• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दिशा सालियान प्रकरणाचा तपास सीबीआयकडे, वडील म्हणाले, आता 100 टक्के..

September 2, 2026 by admin Leave a Comment


Disha Salian : दिशा सालियान प्रकरणात मोठा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला. दिशा सालियन प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून सतत आरोप केली जात आहेत. त्यातच आता कोर्टाने थेट दिशा सालियन प्रकरणाचा तपास हा सीबीआयने करावा असे म्हटले. सालियान कुटुंबाकडून सातत्याने आरोप केली जात आहेत. त्यात थेट आदित्य ठाकरेंचे नाव आले. कोणालाही आरोपी म्हणून वागणूक देऊ नये, फक्त जबाब नोंदवावा, असेही कोर्टाने म्हटले. आता दिशा सालियान प्रकरणात तपास सीबीआय करणार आहे. तपास करून योग्य तो निष्कर्ष काढा, मग आरोपपत्र दाखल करा, असेही कोर्टाने नमूद केले. कोर्टाच्या या निकालानंतर आता दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी मोठे विधान केले. त्यांनी कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले. मुंबई पोलिसांच्या तपासावर त्यांच्याकडून अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आली. आता अखेर तपास सीबीआयकडे देण्यात आला.

सतीश सालियान यांनी म्हटले की, कोर्टाने जे केले ते योग्य आहे. इथूनपु़ढे न्याय मिळेल हे 100 टक्के वाटतंय. कोर्ट काही चुकी नाही करणार कधीपण. आता सर्व आरोपींची चाैकशी करावी लागणार आहे. योग्य तपास झाला नसल्याचेही दिशा सालियान हिच्या वडिलांनी म्हटले. दिशाच्या वडिलांनी कोर्टाचे आभार मानले.

सीबीआयच्या माध्यमातून योग्य तपास होईल, असेही दिशाच्या वडिलांनी म्हटले. दिशा सालियानचे वडील गेल्या काही दिवसांपासून न्यायाची लढाई लढत आहेत. या प्रकरणात आदित्य ठाकरेंचे थेट नाव आहे. आदित्य ठाकरेंवर सतत गंभीर आरोप केली जात आहेत. त्यातच आता थेट सीबीआयकडे हे प्रकरण गेले. त्यामुळे हा मोठा दणका नक्कीच म्हणावा लागेल.

दिशा सालियान दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची एक्स मॅनेजर होती. दिशा सालियान हिच्या मृत्यूनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाली. इतक्या उंचाहून पडून फक्त तोंडातूनच रक्त कसे आले, असाही सवाल उपस्थित कोर्टाने केला. आता या प्रकरणात काही मोठे खुलासे होऊ शकतात. सुरूवातीपासूनच या प्रकरणात सातत्याने आदित्य ठाकरेंचे नाव येताना दिसले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Krushanraj Mahadik: मनसेच्या चोरांना… भाजयुमोचे कृष्णराज महाडिक यांचा पार चढला, मोदी यांच्या फोटोवरील वादवर सणसणीत प्रतिक्रिया
  • आधी तुमच्या बहिणीला पुढे आणा… राहुल गांधींविरोधात भाजपचं जोरदार आंदोलन, काळ्या फिती लावून घोषणाबाजी
  • आरएसएस महिलेला सरसंघचालक करणार का? पृथ्वीराज चव्हाण यांचा रोखठोक सवाल; भाजपची कोंडी?
  • Disha Salian Case Update | दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड! हायकोर्टाच्या आदेशानंतर तपास CBIकडे, आता सत्याचा शोध लागणार?
  • Todays Gold Rate: आनंदाची बातमी, सोन्याचे दर धडाम! थेट 4950 रुपयांची घसरण, आज 10 ग्रॅमसाठी…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in