• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दिल्लीच्या CJP च्या आंदोलनात AIIMS च्या निवासी डॉक्टरांची एन्ट्री; थेट राष्ट्रपतींना लिहिलं पत्र, काय-काय मागण्या केल्या?

July 21, 2026 by admin Leave a Comment


दिल्ली पोलिसांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांवर लाठीचार्ज केला. पोलिसांनी आंदोलकांना जंतर-मंतरवर रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही आंदोलक पोलिसांची नजर चुकवून संसदेच्या दारात पोहोचले. आंदोलक संसद भवन परिसरात पोहोचल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. तर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज देखील केला. या आंदोलनात हजारो आंदोलक विद्यार्थी जखमी झाल्याचं समोर आलं. कालच्या आंदोलनानंतर आता आज मंगळवारी पुन्हा कॉक्रोच जनता पार्टी आक्रमक झाली आहे. त्यांनी आज पुन्हा संसदेवर मार्च काढण्याची घोषणा केली आहे. आता या आंदोलनात एम्स निवासी डॉक्टर संघटनांची देखील एन्ट्री झाली आहे. निवासी डॉक्टर संघटनांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पत्र लिहून अनेक मागण्या केल्या आहेत.

दिल्लीच्या जंतर-मंतरवर मागील एका महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषणाची घोषणा केली. त्यांच्या उपोषणाला 20 दिवस झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी कारवाई केली. कोर्टाच्या निर्देशानुसार दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर करून सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केले. परंतु सोनम वांगचुक यांनी रुग्णालयातूनही उपोषण सुरूच ठेवलं आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचे पडसाद संसदेतही उमटले. विरोधकांनी नीट पेपरफुटीवरून सरकारला घेरलं. आता या प्रकरणात एम्सच्या निवासी डॉक्टर संघटनांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिलं आहे. या संघटनेचं पत्र खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शेअर केलं आहे.

 

🚨 The Resident Doctors’ Association (RDA), AIIMS New Delhi, @AIIMSRDA has written to the Hon’ble President of India, expressing serious concern over reports and widely circulated visuals from the protests at Jantar Mantar.

The letter calls for:

• An independent, impartial,… pic.twitter.com/13gDvPtLPx

— Dr. Datta M.D. (Radiology) building CRASHLab.in (@DrDatta_AIIMS) July 20, 2026

एम्सच्या निवासी डॉक्टर संघटनेच्या मागण्या काय आहेत?

निवासी डॉक्टर संघटनेने पत्रात म्हटलं की, ‘दिल्लीत घडलेल्या घटनांची स्वतंत्र, निप्पक्ष चौकशी करण्यात यावी. कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू असताना अचानक पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या, त्याची सखोल चौकशी करावी. सभा घेणे आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या अधिकारांचं संरक्षण करण्यात यावं. आंदोलनस्थळी आणि इतर परिसरात गैरप्रकार होत असतील, तर संबंधितांवर निश्चित कारवाई करण्यात यावी. सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या उपचारांबाबत स्पष्टता आणावी’. तसेच लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला अतिरिक्त बळाचा वापर न करता संयम आणि पारदर्शकतेने प्रतिसाद दिला गेला पाहिजे, असंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हे चार लोक सापापेक्षाही जास्त असतात विषारी, कधीच करू नका मैत्री, अन्यथा होईल मोठं नुकसान
  • ओम्या शर्यतीचा राजा गेला..७ थार, २ स्कोर्पिओ, ३ जेसीबी, ८ ट्रॅक्टरनी दुचाकी खोऱ्याने जिंकणारा भारतकेसरी !
  • संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले…
  • ना कसला दिखावा, ना मोठेपणा…दिग्गज क्रिकेटपटूने केला चक्क मेट्रोतून प्रवास, साधेपणाचं कौतुक, Photo Viral
  • Airtel, Jio की Vi, कोण ठरलं नंबर वन? TRAI चा रिपोर्ट समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in