• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दारूची बाटली लिटरमध्ये का नसते? फुल, हाफ, क्वार्टर असे का म्हणतात? 99 टक्के मद्यप्रेमींनाही माहिती नाही

August 21, 2026 by admin Leave a Comment


भारतासह जगभरात मोठ्या प्रमाणात दारू रिचवली जाते. मात्र तुमच्या लक्षात आले असेल की दारू कधीच लिटरमध्ये मोजली जात नाही. दारू हा एक द्रवपदार्थ आहे. द्रवपदार्थांचे मोजमाप साधारणपणे लिटर किंवा मिलिलिटरमध्ये केले जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवर 1000 मिलिलिटर म्हणजे 1 लिटर मानले जाते. त्यामुळे 1000 मिलिलिटर हे एक पूर्ण युनिट आणि त्याच्या अर्ध्या प्रमाणाला 500 मिलिलिटर म्हणता येते. मात्र, दारूच्या बाबतीत विशेषतः भारतात हे मोजमाप थोडे वेगळे आहे.

दारूची बाटली 1 लिटरची का नसते?

नियमाप्रमाणे 1000 मिलिलिटरची बाटली म्हणजे फुल आणि 500 मिलिलिटरची बाटली म्हणजे हाफ असायला हवी. मात्र, भारतात दारूची फुल बाटली 750 मिलिलिटरची असते. त्याचप्रमाणे 375 मिलिलिटरच्या बाटलीला हाफ म्हटले जाते. तर 180 मिलिलिटरच्या बाटलीला क्वार्टर म्हटले जाते. दारूच्या बाबतीत मोजमापाचा हा वेगळा पॅटर्न का आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. मात्र याचे उत्तर कदाचित 99 टक्के मद्यप्रेमींनाही माहिती नाही.

ब्रिटिशांचा मोठा प्रभाव

तुमच्या मनातील या प्रश्वाचे उत्तर जगभर दारू सर्व्ह करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक मोजमापाच्या पद्धतीत दडलेले आहे. जगभरात दारूचे प्रमाण पूर्वी औंसमध्ये मोजले जात असे. एक औंस साधारण 29 मिलिलिटर म्हणजे जवळपास 30 मिलिलिटर असतो. भारतात दारू पिण्याच्या संस्कृतीवर ब्रिटिशांचा मोठा प्रभाव राहिला आहे. ब्रिटिश काळात दारू सर्व्ह करण्यासाठी साधारण 30 मिलिलिटरचा स्मॉल पेग वापरला जात असे. त्याचप्रमाणे 60 आणि 90 मिलिलिटरचे मोठे पेगही प्रचलित होते. हेच मोजमाप आता भागतात वापरले जाते.

फुल बाटली 750 मिलीची

याच प्रमाणाच्या आधारे दारूच्या बाटल्यांचे आकारही ठरू लागले. 30 आणि 60 मिलिलिटरच्या गुणाकारानुसार 180 मिलिलिटरची क्वार्टर, 375 मिलिलिटरची हाफ आणि 750 मिलिलिटरची फुल बाटली अशी पद्धत रूढ झाली. म्हणूनच भारतात दारूची ‘फुल बाटली’ म्हणजे 1 लिटर नव्हे, तर 750 मिलिलिटर असते. आताही हीच पद्धत प्रचलित आहे. दारू खरेदी करताना कोणताही मद्यपी एक लिटर दारू द्या असं म्हणताना सापडणार नाही. याउलट एक क्वार्टर किंवा खंबा द्या असं म्हटलं जातं.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in