• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दरमहा भरता, तरी नाही येत सांगता? EMI चा फुलफॉर्म काय? अर्थ समजून घेतला तर CIBIL खराब नाही होणार

August 23, 2026 by admin Leave a Comment


नवीन घर खरेदी, कार, महागडा स्मार्टफोन वा इतर मोठ्या वस्तूच्या खरेदीसाठी EMI चा पर्याय पहिला असतो. दरमहा आपल्या बँक खात्यातून हप्त्याची रक्कम कपात होते. तरीही अनेकांना ईएमआयचा फुलफॉर्म माहिती नाही. त्याचे गणितही आपण कधी खोलात जाऊन माहिती करून घेत नाही. व्याजाचा टक्का तितका आपण पाहतो. EMI चा फुल फॉर्म Equated Monthly Installment असा आहे. म्हणजे ‘एक समान मासिक हप्ता’ असा त्याचा अर्थ आहे. याआधारे एक निश्चित रक्कम दरमहा तुमच्या खात्यातून कर्ज हप्त्यापोटी वळती होते.

EMI चे गणित समजून घ्या

जेव्हा तुम्ही बँकेत अथवा वित्तीय संस्थेत कर्ज घेता. तेव्हा ती रक्कम एकदम परत करायची नसते. बँक कर्ज रक्कम म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट, त्यावरील व्याज आणि कर्ज कालावधी हे मिळून एक हिशोब करते. एक गणित मांडते. त्यानंतर एक समान रक्कम महिन्यांमध्ये विभागली जाते. त्यामुळे एकाचवेळी कर्जदारावर कर्जाचा बोजा पडत नाही. पण व्याजाच्या माध्यमातून बँकेला फायदा होतो. जास्त कालावधीसाठी कर्ज घेतल्यास व्याज जास्त भरावे लागते. सुरुवातीला व्याजाची रक्कम अधिक आणि मूळ कर्ज रक्कम कमी असते. नंतर पुढील काही वर्षात हे प्रमाण व्यस्त होते.

या गोष्ठी गाठीशी बांधा

मूळ रक्कम (Principal Amount): तुम्हाला बँक जे कर्ज मंजूर करते. त्याला मूळ रक्कम म्हणून ओळखले जाते.

व्याज दर (Interest Rate): बँक कर्जावर व्याजदर आकारते. त्यातही एक निश्चित आणि एक फ्लोटिंग असे प्रकार असतात.

कालावधी (Tenure): कर्ज किती कालावधीसाठी घेतले, त्याचा उल्लेख विवरण पत्रात असतो.

EMI थकल्यास मोठा फटका

दरमहा वेळेवर EMI न चुकता भरणे गरजेचे आहे. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर, सिबिल स्कोअर आणि आर्थिक क्षमता चांगली असल्याचे मानले जाते. चुकून हप्ता जमा झाला नाही तर बँक संधी देते. पण ईएमआय भरला नाही तर मग बँक विलंब शुल्कासह हप्ता जमा करण्यास सांगते. त्याचा परिणाम क्रेडिट स्कोअरवर होतो. एकही हप्ता न थकवता झटपट हप्ता जमा केल्यास सिबिल स्कोअर चांगला राहिल. दुसऱ्यांदा कर्ज घेताना बँका मदतीला धावतील.  हप्ता थकवलेला असेल , सिबिल हिस्ट्री खराब असेल तर सिबिल स्कोअर दुरुस्तीसाठी मग वेळ खर्ची पडतो. वेळेवर बँका कर्ज देते नाहीत. त्यासाठी नियमीत कर्ज परतफेड करणे गरजेचे आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in