
एकीकडे अमराठी भाषिक रिक्षा चालकांना ग्राहकांशी मराठीत बोलण्यासाठी राज्य सरकारने सोप्या मराठी भाषेतील संवादाचे प्रशिक्षण वर्ग सुरु केले आहेत.तसेच या अमराठी रिक्षा चालकांची मराठी शिकण्याची मुदत उद्या संपत असून कारवाई सुरु करणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. तर दुसरीकडे नवीमुंबईतील एका उत्तर भारतीय विकास सेनेच्या नेत्याने आता थेट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनाच थेट आव्हान दिले आहे. जा मराठी नाहीच बोलणार, रिक्षा चालवणार आणि पैसेही कमावणार अशी धमकीच या नेत्याने दिली आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply