• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तोंड दाबलं, मारहाण केली; हे पोलीस नाहीत, हे तर RSS चे गुंड, अभिजित दीपकेंचे दिल्ली पोलिसांवर टीका

July 18, 2026 by admin Leave a Comment


दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनादरम्यान आज मोठा गोंधळ उडाला. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतर आंदोलनस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, आंदोलनात सहभागी असलेल्या अभिजित दीपके यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. सोनम वांगचुक हे गेल्या 20 दिवसांपासून नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात कारवाई आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतर येथे उपोषण करत होते. आज सकाळी दिल्ली पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार आणि वैद्यकीय कारणास्तव त्यांना रुग्णालयात हलविले. या कारवाईदरम्यान आंदोलनस्थळी मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, आंदोलनात सहभागी असलेले कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी दावा केला की, सकाळी ते मित्राकडे गेले असताना पोलिसांनी त्यांना अडवून मारहाण केली, तोंड दाबून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आणि आंदोलनस्थळी जाण्यापासून रोखले. अभिजित दीपके यांनी पुढे आरोप केला की, जंतरमंतर परिसरात मोठ्या प्रमाणात बॅरिकेड्स लावण्यात आले होते. त्यानंतर भिंतीवरून चढून ते आंदोलनस्थळी पोहोचल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, त्यांनी दिल्ली पोलिसांवर अत्यंत गंभीर आरोप करत त्यांच्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, अभिजित दीपके यांनी आंदोलन मागे घेणार नसल्याचे स्पष्ट करत, “आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार, कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही,” अशी भूमिका मांडली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून अभिजित दीपके यांनी केलेल्या आरोपांवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून, या संपूर्ण प्रकरणाकडे देशभराचे लक्ष लागले आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आव्हान देऊ नका, अडचणीत याल… संजय राऊत यांचा सरनाईक यांना इशारा
  • IND vs SL: आता तातडीने बदल होणार… टीम इंडिया जिंकण्याच्या उंबरठ्यावर, तरीही कोचने असं विधान का केलं?
  • MPSC पेपर फुटी प्रकरणात महत्वाची अपडेट; संचालकासह किती जणांना घेतलं ताब्यात?
  • ‘गजिनी’ फेम असिनच्या लेकीला पाहिलंत का? ओणमच्या निमित्तने शेअर केले खास फोटो
  • Nepal flash flood Reason: पावसाचा एक थेंबही नाही, तरीही नेपाळमध्ये महाप्रलय! खरं कारण आलं समोर?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in