• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘तू खूप सुंदर मुलगी आहेस,’ स्टेजवरूनच राहुल गांधींकडून तिचं कौतुक, भर सभेत नेमकं काय घडलं?

August 22, 2026 by admin Leave a Comment


‘छात्रो की गूंज’ या कार्यक्रमाचं पुण्यात आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमाला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हजेरी लावली होती. या संवादादरम्यान त्यांनी महिला व मुलींची सुरक्षा, शिक्षण क्षेत्रातील समस्या, वाढती बेरोजगारी आणि परीक्षांमधील पेपरफुटी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. जवळपास या कार्यक्रमासाठी 25 ते 40 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यात महाविद्यालयीन तरूणांची आणि विशेषत: झेन झी तरूण मोठ्या प्रमाणात होते. या कार्यक्रमापूर्वी बराच राडा झाल्याचं पाहायला मिळालं. कार्यक्रमाच्या एक दिवस आधी एबीवीपी आणि एनएसयूआयचे कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. त्यामुळे या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

राहुल गांधींचा त्या तरूणीसोबत काय संवाद झाला?

या कार्यक्रमाचं औचित्य साधत स्टेजवर राहुल गांधींचा दोन मुलींशी संवाद झाला. यावेळी एका मुलींनी आपल्या व्यथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासमोर मांडल्या. मी माझ्या वडिलांना तीन वर्षांपूर्वी गमावलं आहे. त्यावर राहुल गांधींनी पटकन विचारलं कसं काय? तेव्हा ती म्हणाली की माझ्या वडिलांना कँसर झाला होता. माझे वडील स्वच्छता कर्मचारी होते आणि त्यांच्यावर समाजाचं आणि नातेवाईकांचं प्रेशर होतं. त्यांच्यानंतर मी काही बोलायची तर घरात मी काहीतरी मागत आहे असं वाटायचं. जर हे माझ्या भावाने सांगितलं तर त्याचा हक्कच आहे. पण मी सांगितलं तर हिस्सेदारी मागत असल्याचं समजलं जातं. त्यानंतर मी शिक्षण घेऊन आले तेव्हा माझ्यावर लग्नाचं प्रेशर वाढलं. त्यातही सुंदर वगैर मुलगी असावी असं दिसून आलं. तेव्हा राहुल गांधी म्हणाले की, ‘तू खूप सुंदर आहे.’

विद्यार्थिनीने व्यथा मांडताना पुढे सांगितलं की मी शिक्षित असूनही मला या सगळ्यांना तोंड द्यावं लागतं. त्यावर राहुल गांधींनी आपलं म्हणणं मांडलं आणि सांगितलं की, तुम्हाला असं वाटतं का की पुरूषांनी तुमच्यावर नियंत्रण ठेवावं. तेव्हा गर्दीतून जोरदारपणे ‘नाही’ असं प्रत्युत्तर आलं. त्यानंतर राहुल गांधींनी महिलांवर कसे अत्याचार होतात? याबाबत विश्लेषण केलं.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in