• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तुला 500 रुपये देतो, तुझ्यासोबत एकदा…रिक्षाचालकाची तरुणीकडे किळसवाणी मागणी; व्हिडीओ समोर येताच खळबळ!

August 1, 2026 by admin Leave a Comment


Rickshaw Driver News : भारतातील महिला आजही तेवढ्याच असुरक्षित आहेत, असा आरोप नेमहीच केला जातो. महिलांवर अत्याचार, अन्याय थांबावा यासाठी कठोर कायदे करण्यात आलेले आहेत. परंतू तरीदेखील महिलांवरील बलात्कार, छेडछाडीची प्रकरणं काही कमी झालेली नाहीत. आजकाल तर दिसवाढवळ्या महिलांची छेड काढण्याचे प्रकार सर्रास समोर येतात. दरम्यान, असाच एक धक्कादायक प्रकार एका तरुणीसोबत घडला आहे. रिक्षामधून प्रवास करत असताना रिक्षाचालकाने तिला शरीरसुखाची मागणी केली आहे. हा सर्व प्रकार तरुणीने कॅमेऱ्यात कैद केला असून या घटेनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

नेमकं काय घडलं?

ही घटना आंध्र प्रदेशातील विशापट्टनममधील पेंडुर्थी येथे घडली आहे. एक तरुणी रिक्षामधून प्रवास करत असताना तिला रिक्षाचालकाने चक्क शरीरसुखाची मागणी केली आहे. विशेष म्हणजे मला शरीरसुख दे मी तुला 500 रुपये देतो, असा व्यवहारही तो ठरवत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसतेय. ही घटना घडल्यानंतर संबंधित तरुणीने धाडस दाखवत घडलेल्या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोबतच अन्य तरुणींसोबत असं घडू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

रिक्षाचालक म्हणाला माझी रुम जवळच मला….

घडलेल्या प्रकाराबद्दलची ‘मी माझ्या घराजवळच भाजीपाला घेण्यासाठी गेले होते. मी असे उत्तेजक कपडेदेखील परिधान केलेले नव्हते. घरी येताना मी एका ऑटोरिक्षामध्ये बसले. तो रीक्षावाला रिकामाच बसला होता. म्हणून मग मी त्यातून प्रवास करायचे ठरवले. अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर तो मला शरीरसुखाची मागणी करू लागला. शरीरसुखाच्या बदल्यात मी तुला पैसे देतो, असं तो मला सांगू लागला. माझी इथेच जवळ रुम आहे, असं तो मला सांगत होता,’ अशी हकिकत त्या तरुणीने सांगितली.

मी तुला पैसे देतो मला शरीरसुख दे

तसेच, तो मला काय सांगतोय हे अगोदर मला समजलेच नाही. नंतर मी त्याला तो नेमकं काय म्हणतोय हे पुन्हा एकदा विचारलं त्याच काळात मी माझ्या मोबाईल फोनवर व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू केली. मुलांच्या वसतीगृहासमोर त्याने रिक्षा उभा केला. तिथं आसपास कोणीही नव्हतं. तिथं तो पुन्हा एकदा मी तुला पैसे देतो मला शरीरसुख दे, असं तो सांगत होता. मी लगेच त्याला मला पुढ सोडून दे असं म्हणत मी माझी सुटका करून घेतल्याचंही तिने पुढे सांगितलं.

अशी मागणी करण्याची हिंमत कुठून येते?

माझ्या व्हिडीओ रेकॉर्डिंगमध्ये त्याच्या चेहऱ्याची हलकी झलक आली आहे. मी खाली उतरल्यानंतर थोड्या वेळाने तो पळून गेला, असे सांगून दिवसाढवळ्या एका तरुणीला अशी मागणी करण्याची हिंमत कुठून येते? असा सवाल तिने उपस्थित केला. दरम्यान, संबंधित रिक्षाचालकावर कठोर कारवाईची मागणी केली जातेय.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज… प्रतिक्षा संपली… कर्जमाफीची तिसरी यादी कधी येणार? मोठी अपडेट समोर
  • CM Vijay : LPG सिलेंडरबाबत विजय यांचा सर्वात मोठा निर्णय; जे कुठल्या राज्याला जमलं नाही ते त्यांनी करुन दाखवलं
  • भावासमोर असे कपडे कोण घालतं…, कृती सेनॉनच्या रक्षाबंधच्या जाहिरातीवर गदारोळ, व्हिडीओ व्हायरल
  • Chanakya Niti : पाहुण्यांच्या घरी जात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला
  • Gold Silver Rate: अरेरे सणासुदीला सोने-चांदी पुन्हा आलं रंगात, चार दिवसांत तब्बल 8,000 रुपयांनी भाववाढ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in