• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तुमच्या आवडत्या मालिकांमध्ये जबरदस्त ट्विस्ट, टर्न्स; प्रेक्षकांमध्ये कमालाची उत्सुकता

April 26, 2026 by admin Leave a Comment


'सावळ्याची जणू सावली' मालिकेत सध्या अत्यंत थरारक वळण पाहायला मिळत आहे. रतनच्या लग्नात ओवीचा भीषण अपघात होणार असतो, मात्र सावली वेळेत पोहोचून तिला मृत्यूच्या दाढेतून वाचवणार आहे. विशेष म्हणजे, एकाच ठिकाणी असूनही सारंग आणि सावली यांची भेट होऊ शकत नाही. दरम्यान, सारंग ओवी आणि सुशीलाला घेऊन परतत असताना पोलीस त्याला अडवतात आणि रतनची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली पैसे जप्त करून त्यांना गावाबाहेर काढतात. यातून पोलिसांचं रतनशी असलेलं साटंलोटं समोर येतं. सुशीलाला न्याय मिळवून देण्यासाठी सारंग पुन्हा गावात येतो, पण यादरम्यान गुंड ओवीच्या मागे लागतात. यात सावली तिचं रक्षण करणार आहे. यामुळे दोघींमध्ये मैत्रीचे नात निर्माण होणार आहे. आता सारंग जेव्हा ओवीला न्यायला येईल, तेव्हा तो आणि सावली समोरासमोर येतील का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

'लक्ष्मी निवास'मध्ये भावनाच्या बाळाच्या जिवावर बेतणारा प्रसंग घडणार आहे. आजी भावनाच्या बाळाचा स्वीकार केल्याचं नाटक करते पण तिचं खरं रूप रेणुकाच्या लक्षात येणार आहे. तर दुसरीकडे जयंत आणि जान्हवी लाँग ड्राइव्हवर गेल्यावर जयंत तिला लग्नासाठी प्रपोज करतो. घरामध्ये नीलांबरी एक भयानक कट रचतेय. ती भावनाच्या व्हिटामिनच्या गोळ्या बदलते ज्यामुळे आजीला धक्का बसला आहे. बाजारात विनोदला बघून जयंतची घाबरगुंडी उडते तर भावना आणि सिद्धूमध्ये रोमँटिक क्षण पाहायला मिळतील. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा भावनाच्या बाळाला पुन्हा इजा पोहोचवण्याचा प्रयत्न होणार आहे. सोबतच जान्हवी जयंतचा प्रस्ताव स्वीकारणार का याची प्रेक्षकांना प्रतीक्षा असणार आहे.

'लक्ष्मी निवास'मध्ये भावनाच्या बाळाच्या जिवावर बेतणारा प्रसंग घडणार आहे. आजी भावनाच्या बाळाचा स्वीकार केल्याचं नाटक करते, पण तिचं खरं रूप रेणुकाच्या लक्षात येणार आहे. तर दुसरीकडे जयंत आणि जान्हवी लाँग ड्राइव्हवर गेल्यावर जयंत तिला लग्नासाठी प्रपोज करतो. घरामध्ये नीलांबरी एक भयानक कट रचतेय. ती भावनाच्या व्हिटामिनच्या गोळ्या बदलते, ज्यामुळे आजीला धक्का बसला आहे. बाजारात विनोदला बघून जयंतची घाबरगुंडी उडते, तर भावना आणि सिद्धूमध्ये रोमँटिक क्षण पाहायला मिळतील. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा भावनाच्या बाळाला पुन्हा इजा पोहोचवण्याचा प्रयत्न होणार आहे. सोबतच जान्हवी जयंतचा प्रस्ताव स्वीकारणार का, याची प्रेक्षकांना प्रतीक्षा असणार आहे.

'शुभ श्रावणी'मध्ये  श्रावणी आणि शुभूच्या आयुष्यात सध्या पैशांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. विश्वंभर श्रावणीकडे एक लाख रुपयांची मागणी करतो आणि अलकनंदा हा मार्ग रोखण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. मदतीसाठी श्रावणी तिची बहीण मोक्षाकडे जाते जिथे तिची भेट शिरीष घाणेकर यांच्याशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कथेला खरं वळण तेव्हा मिळणार जेव्हा शुभूच्या घरी एका कार्यक्रमात शुभू आणि श्रावणी नशेत एकमेकांवर असलेल्या प्रेमाची कबुली देतात. या कबुलीमुळे त्यांच्या नात्याला आता कोणती नवी दिशा मिळणार हे पाहणं रंजक ठरेल.

'शुभ श्रावणी'मध्ये श्रावणी आणि शुभूच्या आयुष्यात सध्या पैशांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. विश्वंभर श्रावणीकडे एक लाख रुपयांची मागणी करतो आणि अलकनंदा हा मार्ग रोखण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. मदतीसाठी श्रावणी तिची बहीण मोक्षाकडे जाते, जिथे तिची भेट शिरीष घाणेकर यांच्याशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कथेला खरं वळण तेव्हा मिळणार जेव्हा शुभूच्या घरी एका कार्यक्रमात शुभू आणि श्रावणी नशेत एकमेकांवर असलेल्या प्रेमाची कबुली देतात. या कबुलीमुळे त्यांच्या नात्याला आता कोणती नवी दिशा मिळणार, हे पाहणं रंजक ठरेल.

'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत सध्या कौटुंबिक तणाव शिगेला पोहोचला आहे. अधिरा मंदाकिनीसमोर गुडघे टेकून माफी मागते जे पाहून संपूर्ण कुटुंब अस्वस्थ आहे. दुसरीकडे समर रोपांनी भरलेला टेम्पो वाचवून स्वानंदीची प्रतिमा जपतो. समरचा हा मदतीचा स्वभाव आणि त्याचा पेहराव पाहून स्वानंदी त्याच्या प्रेमात पडणार आहे. त्यांच्यातील ही वाढती जवळीक कथेला एका रोमँटिक वळणावर घेऊन जाणार आहे.

'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत सध्या कौटुंबिक तणाव शिगेला पोहोचला आहे. अधिरा मंदाकिनीसमोर गुडघे टेकून माफी मागते, जे पाहून संपूर्ण कुटुंब अस्वस्थ आहे. दुसरीकडे, समर रोपांनी भरलेला टेम्पो वाचवून स्वानंदीची प्रतिमा जपतो. समरचा हा मदतीचा स्वभाव आणि त्याचा पेहराव पाहून स्वानंदी त्याच्या प्रेमात पडणार आहे. त्यांच्यातील ही वाढती जवळीक कथेला एका रोमँटिक वळणावर घेऊन जाणार आहे.

'सनई चौघडे'मध्ये आसावरीच्या लग्नाची धावपळ सुरू असतानाच अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. आसावरीच्या अंगठीसाठी सोनं जमवताना घरच्यांचा दागिन्यांच्या दुकानात अपमान होतो. शर्वरी आसावरीच्या लग्नासाठी जयकडे आगाऊ पगाराची मागणी करते पण जय तिचा अर्ज फाडून टाकतो. दरम्यान गौतम नशेत घरी आल्याने जय आणि तेजस्विनीला धक्का बसतो. आसावरीला पाहायला पाहुणे येणार असतानाच गौतम तिला भेटण्यासाठी तगादा लावतो ज्यामुळे ती प्रचंड घाबरते. तर इकडे शर्वरी शिताफीने जयच्या केबिनमध्ये शिरून मिटिंग कॅन्सल करते जेणेकरून ती एंगेजमेंटला जाऊ शकेल.

'सनई चौघडे'मध्ये आसावरीच्या लग्नाची धावपळ सुरू असतानाच अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. आसावरीच्या अंगठीसाठी सोनं जमवताना घरच्यांचा दागिन्यांच्या दुकानात अपमान होतो. शर्वरी आसावरीच्या लग्नासाठी जयकडे आगाऊ पगाराची मागणी करते, पण जय तिचा अर्ज फाडून टाकतो. दरम्यान, गौतम नशेत घरी आल्याने जय आणि तेजस्विनीला धक्का बसतो. आसावरीला पाहायला पाहुणे येणार असतानाच गौतम तिला भेटण्यासाठी तगादा लावतो, ज्यामुळे ती प्रचंड घाबरते. तर इकडे शर्वरी शिताफीने जयच्या केबिनमध्ये शिरून मिटिंग कॅन्सल करते, जेणेकरून ती एंगेजमेंटला जाऊ शकेल.

'देवमाणूस मधला अध्याय'मध्ये अजित कुमार पुन्हा एकदा आपल्या जाळ्यात सर्वांना ओढत आहे. पोलिसांचा मार बसल्यानंतर तो बेशुद्ध पडण्याचे नाटक करत हॉस्पिटलमधून पळून जातो. कोर्टात त्याच्याविरुद्ध पुरावे सादर झाल्यावर त्याला पोलीस कोठडी मिळते. यादरम्यान लालीला वकील युगंधर प्रताप भेटतो. युगंधर आपल्या स्टाईलने लालीला प्रभावित करतो आणि तिची केस लढण्याची तयारी दर्शवतो. अजित आणि युगंधरमध्ये आता वर्चस्वाचं युद्ध सुरू झालं आहे.

'देवमाणूस मधला अध्याय'मध्ये अजित कुमार पुन्हा एकदा आपल्या जाळ्यात सर्वांना ओढत आहे. पोलिसांचा मार बसल्यानंतर तो बेशुद्ध पडण्याचे नाटक करत हॉस्पिटलमधून पळून जातो. कोर्टात त्याच्याविरुद्ध पुरावे सादर झाल्यावर त्याला पोलीस कोठडी मिळते. यादरम्यान लालीला वकील युगंधर प्रताप भेटतो. युगंधर आपल्या स्टाईलने लालीला प्रभावित करतो आणि तिची केस लढण्याची तयारी दर्शवतो. अजित आणि युगंधरमध्ये आता वर्चस्वाचं युद्ध सुरू झालं आहे.

'दीप ज्योती' मालिकेत एक भीषण अपघात संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून टाकतो. एका हिट अँड रन केसमध्ये अभिजित आणि सुजयचा मृत्यू होतो. घाबरलेला स्वराज पळून जातो पण दीप तिथेच थांबून मदत करण्याचा प्रयत्न करतो. पोलीस तपासात एका निरपराध वृद्ध ड्रायव्हरला अडकवलं जातं. ज्योती या अन्यायाविरुद्ध उभी राहाते पण स्वराजला वाचवण्यासाठी दीप हा गुन्हा स्वतःवर घेतो. पुरुषोत्तम दीपला पोलिसांच्या स्वाधीन करतो ज्यामुळे समाजात त्याची प्रतिमा उंचावते पण सत्य गाडलं जातं. अभिजितच्या निधनानंतर प्रीती खचून जाते तर ज्योती घर सावरण्यासाठी शिक्षण सोडून भावाचा युनिफॉर्म घालून रिक्षा चालवण्याचा धाडसी निर्णय घेते. जेलमध्ये दीपवर प्राणघातक हल्ला होतो ज्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.

'दीप ज्योती' मालिकेत एक भीषण अपघात संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून टाकतो. एका हिट अँड रन केसमध्ये अभिजित आणि सुजयचा मृत्यू होतो. घाबरलेला स्वराज पळून जातो, पण दीप तिथेच थांबून मदत करण्याचा प्रयत्न करतो. पोलीस तपासात एका निरपराध वृद्ध ड्रायव्हरला अडकवलं जातं. ज्योती या अन्यायाविरुद्ध उभी राहाते, पण स्वराजला वाचवण्यासाठी दीप हा गुन्हा स्वतःवर घेतो. पुरुषोत्तम दीपला पोलिसांच्या स्वाधीन करतो, ज्यामुळे समाजात त्याची प्रतिमा उंचावते पण सत्य गाडलं जातं. अभिजितच्या निधनानंतर प्रीती खचून जाते, तर ज्योती घर सावरण्यासाठी शिक्षण सोडून भावाचा युनिफॉर्म घालून रिक्षा चालवण्याचा धाडसी निर्णय घेते. जेलमध्ये दीपवर प्राणघातक हल्ला होतो, ज्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.

'तारिणी' मालिकेत  खांडेकर कुटुंबात मोठी सून म्हणून तारिणीने आता घराची सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत. ती ईशाकडून कामं करून घेण्यापासून ते सर्वांना शिस्त लावण्यापर्यंत कडक पावलं उचलत आहे. कौशिकी तिला पूर्ण पाठिंबा आहे. दरम्यान युवराजला ब्लॅकमेल करून कोणीतरी पैसे उकळण्याचा प्रयत्न करतंय युवराज कौशिकीचे पैसे चोरतो आणि तारिणी त्याला रंगेहाथ पकडते. यावरून पद्मिनी आणि तारिणीमध्ये वाद होतात. संतापलेला युवराज बेलसरेच्या घरी जाऊन थयथयाट करतो आणि तारिणीने माफी मागितल्याशिवाय घरी परतणार नाही अशी अट घालतो. आता काय असेल तारिणीचं पुढचं पाऊल?

'तारिणी' मालिकेत खांडेकर कुटुंबात मोठी सून म्हणून तारिणीने आता घराची सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत. ती ईशाकडून कामं करून घेण्यापासून ते सर्वांना शिस्त लावण्यापर्यंत कडक पावलं उचलत आहे. कौशिकी तिला पूर्ण पाठिंबा आहे. दरम्यान, युवराजला ब्लॅकमेल करून कोणीतरी पैसे उकळण्याचा प्रयत्न करतंय, युवराज कौशिकीचे पैसे चोरतो आणि तारिणी त्याला रंगेहाथ पकडते. यावरून पद्मिनी आणि तारिणीमध्ये वाद होतात. संतापलेला युवराज बेलसरेच्या घरी जाऊन थयथयाट करतो आणि तारिणीने माफी मागितल्याशिवाय घरी परतणार नाही, अशी अट घालतो. आता काय असेल तारिणीचं पुढचं पाऊल?



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबई- पुणे एक्सप्रेसवरील मिसिंग लिंकचे काम पूर्ण, १ मेला उद्घाटन, प्रवासाचा वेळ किती कमी होणार ? वाचा
  • Narendra Modi : पंतप्रधान मोदींची 300 वर्षे जुन्या थंथनिया कालीबारी मंदिरात विशेष पूजा
  • Vastu Shastra : घरात साप निघला तर सावधान, असतात हे तीन मोठे संकेत, आयुष्यच बदलू जातं
  • अमेरिका इराण युद्धादरम्यान मोठी बातमी; या देशाच्या संरक्षण मंत्र्याला स्फोटात उडवलं, अख्खं कुटुंबच संपलं
  • CSK vs GT: आम्ही सुस्त होतो आणि…! चेन्नई सुपर किंगच्या पराभवानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड संतापला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in