• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तुमचं भाग्य उजळवण्यासाठी अधिकमासात करा ‘हे’ खास 5 उपाय

June 5, 2026 by admin Leave a Comment


अ‍धिक मासात भगवान विष्णू आणि त्यांचे अवतार भगवान कृष्ण यांची पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते. हिंदू मान्यतेनुसार अधिक मासात भगवद्गीता आणि महापुराणाचे पठण केल्याने प्रचंड पुण्य प्राप्त होते. जे भक्त या पवित्र महिन्यात पौर्णिमा, अमावस्या आणि पुरुषोत्तम एकादशीला विहित विधींचे पालन करतात आणि भगवान हरीची पूजा करतात, त्यांना लक्ष्मी आणि नारायणाचा आशीर्वाद प्राप्त होतो. पंचांगानुसार अधिक मास 17 मे पासून सुरू झाला असून 15 जून 2026 रोजी संपणार आहे. चला, पुरुषोत्तम मास संपण्यापूर्वी भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कोणते उपाय केले जातात,याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

‍विष्णूचा आशीर्वाद मिळावा यासाठी तुळशीचे पूजन करणे

अधिक महिन्यात भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही तुळशीची पूजा आणि सेवा केली पाहिजे. हिंदू श्रद्धेनुसार जी व्यक्ती अधिक मासात महिनाभर संध्याकाळी तुळशीच्या रोपासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावतो आणि भगवान हरीच्या ‘ ओम नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करत तुळशीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतात, त्याला सर्व सुख प्राप्त होते.

पवित्र धर्मग्रंथांचे पठण केल्याने इच्छा पूर्ण होतील

हिंदू मान्यतेनुसा अधिक महिन्यात भगवद्गीता, पुराणे, गीता, विष्णू सहस्रनाम आणि इतर धर्मग्रंथांचे पठण किंवा श्रवण केल्याने भरपूर पुण्य प्राप्त होते. भगवान हरीची स्तुती करणाऱ्या या कथा आणि स्तोत्रांचे पठण केल्याने व्यक्तीचे दुःख आणि दुर्दैवापासून रक्षण होते आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

33 अनारसे दान करा

सनातन परंपरेनुसार 33 कोटी देवदेवतांची पूजा केली जाते. म्हणूनच पुरुषोत्तम महिन्यात 33 अनारसे बनवून ते दक्षिणेसह मंदिराच्या पुजाऱ्याला किंवा गरजू व्यक्तीला दान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हिंदू मान्यतेनुसार अधिक महिन्यात अनारसे दान करणे हे भूमीदान करण्याइतकेच पुण्यकारक मानले जाते. पुरुषोत्तम महिन्यातील एकादशी, द्वादशी, पौर्णिमा किंवा अमावस्येच्या दिवशी अनारसे दान करणे अधिक शुभ आणि फलदायी ठरते. अनारसे बनवल्यानंतर प्रथम पूजेदरम्यान ते भगवान विष्णूला अर्पण करावेत आणि नंतर त्यांचे दान करावे.

या महामंत्राचा अवश्य जप करावा

पौराणिक मान्यतेनुसार पुरुषोत्तम महिन्यात योग्य विधींनी भगवान विष्णूची पूजा करून आणि त्यांच्या पवित्र मंत्रांचा जप केल्याने भक्ताला सुख आणि समृद्धी लाभते. अधिक महिन्यात भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी, रोजच्या प्रार्थनेत तुळशीची माळ घेऊन भक्ती आणि श्रद्धेने “ओम नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप करावा.

जर तुम्हाला हे करणे शक्य नसेल तर किमान पंचदीप दान करा आणि त्यांपैकी एक भगवान श्री विष्णूसमोर दिवा लावा, दुसरा तुळशीसमोर, तिसरा पिंपळाच्या झाडाजवळ, चौथा गोशाळेत आणि पाचवा तुमच्या घरातील देव्हाऱ्यात लावा.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in