• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तुझं सत्य लवकर बाहेर येईल..; ‘धुरंधर’ फेम अभिनेत्रीच्या कारवर धमकीची चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

July 29, 2026 by admin Leave a Comment


‘धुरंधर’च्या ‘शरारत’ या गाण्यात झळकून प्रसिद्धीझोतात आलेली टीव्ही अभिनेत्री क्रिस्टल डिसूझाने नुकताच सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला आहे. क्रिस्टलला तिच्या गाडीवर एक संशयास्पद पत्र मिळालं असून याचसंदर्भातील व्हिडीओ तिने चाहत्यांसमोर आणला आहे. या पत्रात क्रिस्टलचं नाव असून त्यातील मजकूर वाचून ती घाबरली आहे. या पत्राद्वारे कोणीतरी तिच्यासोबत मस्करी करत आहे किंवा तिला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. ‘तुझं सत्य लवकरच समोर येईल’, असं या पत्रात लिहिलेलं आहे. हे पत्र वाचून घाबरलेल्या क्रिस्टलने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला आहे.

क्रिस्टल तिचं काम संपवून पार्किंगच्या ठिकाणी गेली होती. तेव्हा तिला तिच्या गाडीच्या विंडशील्डवर एक चिठ्ठी ठेवल्याचं पहायला मिळालं. याचा व्हिडीओ तिने शूट केला आणि तो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. या व्हिडीओच्या सुरुवातीला क्रिस्टलने नेमकं काय घडलं, ते सांगितलं. त्यानंतर तिने फॉलोअर्सना ती चिठ्ठी दाखवली. “मी असं करणारी व्यक्ती नाही. पण माझं नुकतंच काम संपलं आणी मी पार्किंगजवळ आले. ही माझी गाडी.. आणि तिच्या विंडशील्डवर हे होतं,” असं म्हणत ती चिठ्ठीवरील मेसेज वाचून दाखवते. त्यात लिहिलं होतं, ‘क्रिस्टल, आज शक्य तितकं हसून घे. कारण लवकरच तुझं सत्य समोर येईल.’

पहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by MOM-MinutesOfMasala (@minutesofmasala)

या मेसेजमुळे क्रिस्टल गोंधळली. “या घटनेकडे एक विनोद म्हणून पहावं आणि दुर्लक्ष करावं की गांभीर्याने घ्यावं हेच मला कळत नाहीये. सहसा मी अशा गोष्टींची पर्वा करत नाही, पण यावर माझं नावसुद्धा आहे. त्यामुळे मला खात्री आहे की हे काही भलतंसतलं नाही. जर हा एक विनोद असेल, तर तो अजिबात गमतीशीर नाही”, अशा शब्दांत ती चिंता व्यक्त करते. क्रिस्टलच्या या व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चाहत्यांनी तिला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

क्रिस्टल ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. ती तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. ती लवकरच ‘द ट्रेटर्स 2’ या शोमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे हा एक प्रमोशनल व्हिडीओ असू शकतो, असंही म्हटलं जात आहे. ‘ट्रेटर्सची तयारू सुरू आहे वाटतं’, असं एकाने लिहिलं. तर ‘जर असं नसेल तर तिने नक्कीच या चिठ्ठीकडे गांभीर्याने पहावं’, असा सल्ला दुसऱ्याने दिला आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • साखरेचे भाव वाढत असताना रेशन दुकानात सुरु तरी काय? सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ
  • सर्वात मोठी बातमी ! ओबीसी नेत्यांमध्ये फूट? 1 सप्टेंबरच्या मोर्चाआधीच… तायवाडे आणि हाकेंमध्ये जुंपली
  • दोघी भाजपच्या नगरसेविका, महापौर तावडे आणि शिरवडकरांमध्ये वाजलं का? अमित साटम यांनी सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
  • ऑस्ट्रेलियाने भारताला दिला धक्का, शेतकऱ्यांची वाढली चिंता; पाकिस्तानला झाला आनंद
  • साखर कारखान्याबाहेर सभासदांची झुंबड, स्मार्ट बाजारामध्ये साखरेबाबत मोठा निर्णय, 1 व्यक्तीला एकच..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in