• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तुकाराम मुंढेंच्या नव्या इशाऱ्याने हवा टाईट, आधी शाहरुख, अजयला नोटीस, आता चूक केली तर…

August 17, 2026 by admin Leave a Comment


महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे गेल्या काही महिन्यांपासून धडाकेबाज कारवाई करत आहेत. अशातच आता FDA ने अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राज्यात बंदी असलेल्या पान मसाल्याचा अप्रत्यक्ष प्रचार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या तिन्ही कलाकारांनी 2024 मध्ये विमल या पान मसाला कंपनीच्या ‘विमल इलायची’ जाहिरात कँम्पेनमध्ये एकत्र काम केले होते. या प्रकरणी ही नोटीस देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात पान मसाल्यावर बंदी

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र FDA ने जारी केलेल्या नोटिशीत या अभिनेत्यांना संबंधित जाहिरात मोहिमेतील सहभाग तात्काळ थांबवण्याचे तसेच त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवरील सर्व प्रचारात्मक सामग्री हटवण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रात पान मसाल्याचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री यावर बंदी आहे. मात्र तरीही पान मसाल्याची विक्री होत आहे.

नोटिशीत नमूद करण्यात आले आहे की, जाहिरातीत वापरण्यात आलेला विमल इलायची हा शब्दप्रयोग अशा प्रकारे सादर करण्यात आला आहे की त्याचा थेट संबंध ‘विमल पान मसाला’ ब्रँडशी जोडला जातो. FDA च्या मते, अशा प्रकारची जाहिरात ग्राहकांची दिशाभूल करू शकते आणि बंदी असलेल्या उत्पादनाच्या ब्रँडची अप्रत्यक्ष किंवा सरोगेट जाहिरात ठरू शकते. राज्यातील सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने पान मसाल्यावर घालण्यात आलेल्या बंदीचा उल्लेख करत FDA ने याकडे गंभीर लक्ष दिले आहे.

दंडात्मक कारवाईची शक्यता

गुटखा आणि इतर बंदी घातलेल्या तंबाखूजन्य पदार्थांवर कारवाई करणाऱ्या FDA ने या अभिनेत्यांकडून जाहिरात करारांच्या प्रती, मोहिमेची माहिती, मानधनासंबंधी तपशील आणि जाहिरातीपूर्वी करण्यात आलेल्या पडताळणीचे पुरावेही मागितले आहेत. ग्राहक संरक्षण कायद्यांनुसार, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे 10 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. तसेच संबंधित सेलिब्रिटींना तीन वर्षांपर्यंत कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करण्यास बंदी घालण्याची तरतूदही आहे. याचा फटका या कलाकारांना बसू शकतो.

नोटिशीनंतर दिशाभूल करणाऱ्या जाहिरातदारांना गंभीर इशारा

शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना नोटिसा बजावल्यानंतर FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिशाभूल करणाऱ्या आणि सरोगेट जाहिरातींविरोधात कठोर इशारा दिला आहे. PTI शी बोलताना मुंढे यांनी स्पष्ट केले की, ‘दिशाभूल करणाऱ्या किंवा सरोगेट जाहिरातींना परवानगी नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जाहिरातदारांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.’ मुंढे यांच्या या इशाऱ्यामुळे अनेकांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in