• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

…तर सावर्जनिक जीवनातून निवृत्ती घेईन, दिलीप वळसे पाटील यांचा मोठा इशारा

August 1, 2026 by admin Leave a Comment


अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) दुधाच्या व्यवसायावर केलेल्या कारवाईवरून सुरू असलेल्या राजकीय चिखलफेकीवर आंबेगावचे आमदार आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अत्यंत आक्रमक झाले आहेत. दूध भेसळ किंवा कोणत्याही बेकायदेशीर प्रकरणात आपला दूरान्वयानेही संबंध सिद्ध झाला, तर एका मिनिटाचाही विलंब न लावता सार्वजनिक जीवनातून मी संन्यास घेईन, असे खुले आव्हान दिलीप वळसे पाटील यांनी राजकीय विरोधकांना दिले आहे. दिलीप वळसे पाटील यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे त्यांच्यावरील आरोपांचा कडक शब्दांत समाचार घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून एफडीएच्या माध्यमातून राज्यात आणि अंबेगाव तालुक्यात दूध व्यावसायिकांवर तपासणी करून कारवाई केली जात आहे. ही कारवाई अजूनही सुरूच आहे. मात्र, ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही, त्या गोष्टींशी आपले नाव जोडून आपली राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न काही राजकीय विरोधकांकडून जाणीवपूर्वक केला जात असल्याचा आरोप दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे. भेसळ करणारी कोणतीही व्यक्ती, कंपनी किंवा संस्था असो, आपण कधीही कोणाच्याही पाठीशी उभे राहणार नाही, असे सांगत एफडीए आणि पोलीस प्रशासन अशा लोकांवर कडक कारवाई करण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचेही ते म्हणाले.

अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार

आपल्यावर खोटे-नाटे आरोप करून राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याचे षडयंत्र सुरू आहे. विरोधकांनी ही खोडसाळ बदनामी त्वरित थांबवली नाही, तर त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात (High Court) फौजदारी (Criminal) आणि मोठ्या आर्थिक अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा थेट इशारा दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे. आपण नेहमीच स्वच्छ आणि पारदर्शक राजकारण केले असून जनता, समाजमाध्यमे आणि वृत्तपत्रांनी या राजकीय षडयंत्राची नोंद घ्यावी, असे आवाहन करीत शेवटी सत्याचाच विजय होईल, असा विश्वास दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज… प्रतिक्षा संपली… कर्जमाफीची तिसरी यादी कधी येणार? मोठी अपडेट समोर
  • CM Vijay : LPG सिलेंडरबाबत विजय यांचा सर्वात मोठा निर्णय; जे कुठल्या राज्याला जमलं नाही ते त्यांनी करुन दाखवलं
  • भावासमोर असे कपडे कोण घालतं…, कृती सेनॉनच्या रक्षाबंधच्या जाहिरातीवर गदारोळ, व्हिडीओ व्हायरल
  • Chanakya Niti : पाहुण्यांच्या घरी जात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला
  • Gold Silver Rate: अरेरे सणासुदीला सोने-चांदी पुन्हा आलं रंगात, चार दिवसांत तब्बल 8,000 रुपयांनी भाववाढ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in