
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शासकीय सबसिडी प्रकरणांमध्ये कसलीही बोगसगिरी खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. इतकेच नाही तर तंबी दिल्यांतर मुंडेंनी एक मोठी योजना जाहीर केली. नेमकं काय घडलं? जाणुन घ्या…
पंकजा मुंडे यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली, ज्यात तरुणांना उद्योगासाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्या म्हणाल्या की, एक कोटी रुपयांच्या उद्योगाला शासनाकडून 50 लाख रुपयांची सबसिडी दिली जाईल. या योजनेचा मुख्य उद्देश तरुणांना उद्योजक बनण्यास प्रवृत्त करणे हा आहे, विशेषतः पशुसंवर्धन खात्यामध्ये प्रत्येक गावात उद्योजक तयार करण्याचे ध्येय आहे. ही 50 टक्के सबसिडी योजना पूर्णपणे नियमांनुसार असेल. पंकजा मुंडे यांनी यावर जोर दिला की, ही योजना केवळ बिल उचलण्यासाठी किंवा चुकीच्या मार्गाने पैसे मिळवण्यासाठी नाही. रस्त्यांशिवाय बिले काढणे किंवा सभागृहांशिवाय नावाचा गैरवापर करून पैसे हडप करणे, अशा कोणत्याही प्रकारची बोगसगिरी सहन केली जाणार नाही.
नियमांनुसार काम करणे महत्त्वाचे आहे, कारण जो नियमांनी जगायला शिकवतो आणि राहायला शिकवतो, तोच खरा नेता असतो आणि तोच नेता लोकांचे जीवन सुकर करतो, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
Leave a Reply