• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ठाकरे गटाची साथ सोडणाऱ्या 6 खासदारांची जाणार खासदारकी? थेट विधिमंडळाचे माजी सचिव म्हणाले..

June 18, 2026 by admin Leave a Comment


6 खासदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेना ठाकरे गटाने व्हिप जारी केले. त्यानुसार आज दिल्लीत बैठक पार पडतंय. शेवटी ज्याची भीती शिवसेना ठाकरे गटाला होती, तेच घडलंय. या बैठकीला 6 खासदारांनी दांडी मारली. त्यामुळे शिवसेनेतील 6 खासदार शिवसेना शिंदे गटात दाखल होणार स्पष्ट आहे. आता व्हिप जारी केल्यानंतरही पक्षाच्या बैठकीला उपस्थित न राहिलेल्या खासदारांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून ज्या खासदारांची नावे घेतली जात आहेत, तेच खासदार बैठकीला अनुपस्थितीत आहेत. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला. हा धक्का थेट उद्धव ठाकरे यांना म्हणावा लागणार आहे. कालच शिंदे गटाकडून स्पष्ट करण्यात आले होते की, आमचे ऑपरेशन टायगर यशस्वी झाले. त्यामध्येच आता या 6 खासदारांनी बैठकीला अनुपस्थिती दर्शवली आहे. दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, या सर्व खासदारांना सुरक्षितस्थळी हालवण्यात आले. त्यामुळे सध्याच्या घडीला स्पष्ट आहे की, शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. याबाबत बोलताना विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी म्हटले की, शिवसेना ठाकरे यांच्याकडे 9 खासदार आहेत. आता त्यापैकी 6 खासदार त्यांच्या दुसऱ्या गटाकडे आहेत.

त्यामुळे आता हे सर्व यशस्वी होऊ शकते. इथे 6 अनुपस्थितीत आहेत, म्हणजे ते 6 दुसऱ्या बाजूला गेले, म्हणजे त्यांच्याकडे फक्त 3 च आहेत. व्हिप मोडला म्हणून ते फाईल तयार करतील. पण हा विषय सर्वाेच्च न्यायालयात गेल्या चार ते पाच वर्षापासून प्रलंबित आहे. त्या देखील शिवसेनेच्या केसमध्ये व्हिप मोडला गेला आहे. त्यावर सर्वाेच्च न्यायालय काहीही सांगत नाही.

मी न्यायालयाचा आदर राखून सांगतो की, न्यायालयाने याचा निर्णय द्यावा. याचे काय होईल हे माहिती नाही. परत सर्वाेच्च न्यायालयात जाईल. यावेळी कायदेशीर कारवाईवर बोलताना कळसे यांनी म्हटले की, कसली कायदेशीर कारवाई अगोदरच पेडिंग आहे. परत आता त्याच पक्षामध्ये फुट पडली. अगोदर पडलेल्या फुटीचाच निर्णय आला नाही आणि परत त्याच पक्षात फुट पडली आहे मग हे प्रकरण देखील पुन्हा जाईल, सर्वाेच्च न्यायालयात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एशियन्स गेम्स स्पर्धेपूर्वी आणखी एक धक्का, अभिषेक पालला नाडाची नोटीस! नेमका काय आहे प्रकार
  • Nepal flash flood : नेपाळच्या हायड्रोपॉवरचे ८९८ कर्मचारी वाहून गेले, विविध देशांचे ६२६ जण ठार, तीन हजार बेपत्ता
  • पाच राशींच्या आयुष्याचा कायापालट होणार, जीवन असे बदलणार की…वाचा आजचे राशीभविष्य
  • हॉटेलच्या त्या खोलीत 1 तरूणी, दोन तरूण; दरवाजा उघडताच खळबळ… रूम नंबर 204 मध्ये काय सुरू होतं ?
  • मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in