• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ट्रम्प यांना मोठा झटका, जर भारतीयांना देशाबाहेर काढलं तर अमेरिका एका क्षणात ठप्प होणार, त्या यादीने जगभरात मोठी खळबळ

June 11, 2026 by admin Leave a Comment


अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने अमेरिकेत असलेल्या भारतीय लोकांविरोधात कठोर भूमिका घेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाकडून अमेरिकेत सध्या काम करत असलेल्या भारतीय कर्मचाऱ्यांविरोधात आणि तेथील मुळचे अमेरिकेचे नसलेल्या रहिवाशांविरोधात कठोर पाऊलं उचलली जात आहेत. अमेरिकेत नोकरीसाठी गेलेल्या किंवा इतर कारणांसाठी आलेल्या परदेशी लोकांनी अमेरिका सोडावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच सर्व पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाकडून आता ग्रीन व्हिसा आणि एच 1बी व्हिसा संदर्भातील नियम देखील कठोर करण्यात आले आहेत. एच 1बी व्हिसाच्या फीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ करण्यात आली, याचा फटका सर्वाधिक प्रमाणात भारताला बसत आहे, कारण सध्या स्थितीमध्ये जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा सर्वाधिक भारतीय नागरिक हे अमेरिकेमध्ये वास्तव्याला आहेत.

परदेशी नागरिक पुन्हा एकदा त्यांच्या देशात परत जावेत यासाठी ट्रम्प प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू असून, त्यासाठी अमेरिकेच्या संसदेकडून तब्बल 70 अब्ज डॉलरचा फंड देखील मंजूर करण्यात आला आहे. भारतीय नागरिक किंवा इतर परदेशी नागरिक अमेरिकेच्या प्रगतीमध्ये अडसर ठरत आहे, असं मत तेथील प्रशासनाचं आहे. त्यामुळे सध्या अमेरिकेकडून अमेरिकेत येऊ इच्छिणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी कठोर नियम बनवण्यात आले आहेत.

मात्र आता नुकतीच फोर्ब्सकडून एक यादी जाहीर करण्यात आली आहे. फोर्ब्सच्या या यादीमुळे अमेरिकेला मोठा झटका बसला आहे. या यादीमधून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार समजा जर एकाचवेळी संपूर्ण भारतीय लोकांनी अमेरिका सोडली तर अमेरिकेची अर्थव्यवस्था ही पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळू शकते. फोर्ब्सकडून जी यादी जाहीर करण्यात आली आहे, त्यामध्ये अमेरिकेमधील अशा 250 प्रभावशाली लोकांचा समावेश करण्यात आला आहे, त्यांनी आपल्या कर्तृत्वाने अमेरिकेची अर्थव्यवस्था, आणि तंत्रज्ञान उभं केलं आहे. या यादीमध्ये बहुसंख्य भारतीय नावे आहेत. सत्या नाडेला, सुंदर पिचाई, विनोद खोसला यांच्यासह अनेक भारतीय लोकांची नावे या यादीमध्ये आहेत. जर हे सर्व भारतीय लोक अमेरिकेतून बाहेर पडले तर अमेरिकेतली गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि एडोब सारख्या कंपन्या ठप्प होऊ शकतात.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • डोळ्यातून अश्रूच्या धारा, कोणी जोडले हात, कुणाचा संताप, आदिवासी विद्यार्थ्याची प्रकृती खालावली, सरकार हस्तक्षेप करणार?
  • CID बंद होण्यामागे अंतर्गत राजकारण? दयाचा धक्कादायक दावा; लता मंगेशकरांनी निर्मात्यांना घेतलं होतं फैलावर
  • Kangana Sharma : कास्टिंगच्या नावाखाली नको ती मागणी, अभिनेत्रीला आला हादरवणारा अनुभव
  • खूपच गोड दिसतेय.., पिवळ्या साडीमधील ही अप्सरा कोण? सौंदर्याने लावलं चाहत्यांना वेड
  • भारताने 500 धावांचा पल्ला कोणत्या संघाविरुद्ध सर्वाधिक वेळा गाठला आहे? जाणून घ्या एका क्लिकवर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in