• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

टॉयलेटमध्ये लपून बसला होता 7 फूट लांब साप, अन् कुटुंब घरात…, पुढे जे झालं VIDEO पाहून उडेल थरकाप

August 19, 2026 by admin Leave a Comment


मध्य प्रदेशच्या देवासच्या पितावली गावातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शोएब पटेल नावाच्या गृहस्थाच्या घरातील भारतीय पद्धतीच्या टॉयलेटमध्ये 7 फुटांचा भलामोठा साप लपून बसला होता. कुटुंबातील एका सदस्यांची नजर सापावर पडली, त्यानंतर संपूर्ण घरात एकच खळबळ उडाली. टॉयलेटमध्ये भलामोठा साप आढळल्याची बाब उघडकीस आल्यानंतर संपूर्ण गावात भीतीचं वातावरण पसरलं.

साप आढळ्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने सर्पमित्राला माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्र तातडीने घटनास्थळी पोहोचला. टॉयलेटच्या सीटमधून विषारी साप बाहेर काढणे फार अवघड काम होते. जवळपास एका तासांच्या प्रयत्नानंतर एकदम काळजीपूर्वक सापाला रेस्क्यू करण्यात आलं. सापाला रेस्क्यू केल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. सर्पमित्र शोएबने सापाला कोणतीही इजा न करता प्लास्टिकच्या डब्यात बंदीस्त केलं. त्यानंतर या सापाला जंगलात सोडलं.

सापाचा व्हिडिओ व्हायरल 

टॉयलेटमधील या सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे . आता शौचालयाला जाण्यापूर्वी आजूबाजूला पाहिलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्या आहेत. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, भलामोठा साप हा टॉयलेटच्या एका कोपऱ्यात बसला होता. त्यानंतर सर्पमित्राने सापाच्या डोक्याला पकडून बाहेर काढलं. भलामोठ्या सापामुळे कुटुंब टेन्शनमध्ये आले होते. टॉयलेट सीटमध्ये आढळलेल्या सापाने गावकऱ्यांचीही चिंता वाढली आहे.

अंधारात चालताना घ्या काळजी 

तत्पूर्वी, विशेष म्हणजे पावसाळ्यात बाथरुमच्या ड्रेनेज सिस्टमच्या आतून टॉयलेटमध्ये शिरतात. भारतासहित विविध देशात टॉयलेट सीटमध्ये साप आढळून आल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात देवास जिल्ह्यात साप आढळण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. त्यामुळे शौचालय, झुडप आणि अंधारातून पायवाटेने जाताना काळजी घेतली पाहिजे. साप आढळून आल्यावर मारू नये, तर सर्पमित्राला बोलावावे, जेणेकरून साप सुरक्षितपणे पकडता येईल. त्यानंतर जंगलात सोडता येईल. तसेचा सापाला जीवदान देखील मिळेल. विनाकारण सापाची हत्या करणे, कायदेशीर गुन्हा आहे. सापाची मारल्यास तुम्ही तुरुंगाची शिक्षा भोगावी लागू शकते, त्यामुळे साप दिसल्यावर घाबरून जाऊ नये. सापाला पाहून थेट सर्पमाित्राला फोन करून कळवणे फायदेशीर ठरेल.

(Disclaimer : व्हिडिओमध्ये भीतीदायक दृश्ये आहेत. त्यामुळे तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला नाही.)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in