• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

टेन्शन वाढले, गुन्हेगारी रेकॉर्ड नाही संशयही नाही, खलिस्तानी नेटवर्कची भरतीची नवी पद्धत..

August 22, 2026 by admin Leave a Comment


खलिस्तान समर्थक दहशतवादी संघटनांनी त्यांच्या भरती धोरणात मोठा बदल केला आहे. अहवालानुसार, या गटांकडून आता सामान्य जीवन जगणाऱ्या, पोलिसांच्या नजरेत संशयित नसलेल्या आणि यापूर्वी कोणत्याही गुन्ह्यात सहभागी नसलेल्या तरुणांनाही या नेटवर्कमध्ये ओढण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, पूर्वी ही दहशतवादी संघटना भरतीसाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांवर अधिक अवलंबून असायची. मात्र, आता या दहशतवादी संघटनेनी भरतीची पद्धत बदलत असून आता गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या सामान्य तरुणांना सोशल मीडिया, ऑनलाइन संपर्क आणि वैयक्तिक संबंधांच्या माध्यमातून आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. यंत्रणेच्या अधिकाऱ्यांच्या मते, या बदलामुळे सुरक्षा यंत्रणेसमोर एक नवीन आव्हान उभे राहिले आहे, कारण अशा व्यक्तींना सुरुवातीच्या टप्प्यात ओळखणे तुलनेने कठीण असू शकते. त्यामुळे सोशल मीडियावरील संशयास्पद संपर्क आणि ऑनलाइन प्रलोभनांवर सुरक्षा यंत्रणांचे लक्ष वाढले आहे.

दहशतवादी कारवायांकडे वळण्याचा धोका

सुरक्षा यंत्रणांच्या मते, काही कट्टरपंथी गट सोशल मीडिया, चुकीची माहिती, आर्थिक आमिष किंवा वैयक्तिक ओळखींच्या माध्यमातून सामान्य तरुणांशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न करतात. सुरुवातीला हा संपर्क साध्या संवादासारखा वाटू शकतो. मात्र पुढे त्यातून कट्टर विचारांचा प्रभाव वाढून तरुणांना गंभीर गुन्हेगारी किंवा दहशतवादी कारवायांकडे वळवले जाण्याचा धोका असतो.

या प्रक्रियेत फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर केला जात असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. आधी वैचारिक किंवा प्रक्षोभक मजकूर पोहोचवला जातो आणि त्यानंतर वैयक्तिक संपर्कातून प्रभाव टाकण्यासाठी केला जातो. न्यायालयीन खटल्यांमधून हे देखील उघड झाले आहे की, खलिस्तान समर्थक नेटवर्कशी संबंधित व्यक्तींनी तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांची भरती करण्यासाठी सोशल मीडिया पेजेस आणि यूट्यूब चॅनेलचा वापर केला आहे.

एनआयए देखील सतर्क

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) देखील ऑनलाइन कट्टरतावादाला एक गंभीर आव्हान म्हणून मान्यता दिली आहे. संस्थेनुसार इंटरनेटवरील मजकूर आणि ऑनलाइन समुदायांच्या माध्यमातून लोकांना हळूहळू अतिरेकी विचारांकडे प्रभावित केले जाऊ शकते. एनआयएने ऑनलाइन कट्टरतावादाशी संबंधित संशयास्पद हालचालींची तक्रार करण्यासाठी एक विशेष प्रणाली देखील स्थापित केली आहे.

सुरक्षा यंत्रणांच्या मते, काही प्रकरणांमध्ये दहशतवादी गट आणि गुन्हेगारी टोळ्यांमध्ये संपर्क असल्याचे समोर आले आहे. परदेशात बसलेले सूत्रधार सोशल मीडिया किंवा सुरक्षित मेसेजिंग अॅप्सच्या माध्यमातून स्थानिक तरुणांशी संपर्क साधू शकतात.

यामुळे भरतीची प्रक्रिया थेट न राहता वेगवेगळ्या व्यक्ती आणि गटांमार्फत केली जाऊ शकते. त्यामुळे एखाद्या तरुणाची या नेटवर्कमधील नेमकी भूमिका काय आहे, हे सुरुवातीला तपास यंत्रणांना ओळखणे कठीण होऊ शकते.

थोडक्यात परदेशातील सूत्रधार आणि स्थानिक तरुण यांच्यात ऑनलाइन माध्यमातून संपर्क निर्माण करून दहशतवादी किंवा गुन्हेगारी नेटवर्कचा विस्तार करण्याचा धोका सुरक्षा यंत्रणांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in